Search This Blog

Thursday, 24 September 2026

28 सप्टेंबर रोजी महाउपलब्धीबाबत कार्यशाळा


28 सप्टेंबर रोजी महाउपलब्धीबाबत कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 24 : सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारका करीता महाउपलब्धीबाबत प्रशिक्षण 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपुर येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. राज्य शासनाचे सर्व सेवानिवृती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी सोबत निवृत्तीवेतन ज्या बँक खात्यातून उचल करतात, त्या बँक खात्याचे पासबुक, ई-केवायसी, बँक खातेला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक तसेच पीपीओ क्रमांक कार्यशाळेला उपस्थित राहाताना सोबत आणावे,असे जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment