राणी हिराई उमेद मार्ट येथे विशेष गणेशोत्सव विक्री प्रदर्शनाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 10 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने 'राणी हिराई उमेद मार्ट' येथे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून विशेष वस्तू विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन दिनांक 12 ते 14 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
14 सप्टेंबर 2026 पासून राज्यभरात सुरू होणारा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा व्हावा, तसेच ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्दे्शाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये व उपलब्ध वस्तू : आकर्षक गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, नैसर्गिक व रेशमी हार तसेच विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य. स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू, हस्तकलेचे नमुने, सुशोभीकरणाचे साहित्य व खाद्यपदार्थ.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करावी आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment