Search This Blog

Friday, 18 September 2026

द्रवनत्र व वीर्यमात्रा वाहतुकीसाठी कंत्राटदारांकडून दरपत्रके आमंत्रित


 द्रवनत्र व वीर्यमात्रा वाहतुकीसाठी कंत्राटदारांकडून दरपत्रके आमंत्रित

Ø 25 सप्टेंबरपर्यंत सीलबंद दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : जिल्ह्यातील पशुपालकांना पशुप्रजनन विषयक सेवा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक द्रवनत्र व वीर्यमात्रांची वाहतूक करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त कार्यालय, चंद्रपूर यांच्यामार्फत इच्छुक वाहतूक कंत्राटदारांकडून 1 ऑक्टोबर 2026 ते 30 जून 2027 या कालावधीकरिता सीलबंद दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत तसेच आवश्यकतेनुसार जिल्ह्याबाहेर आणि परराज्यातून द्रवनत्र व वीर्यमात्रांची वाहतूक करण्यासाठी 2.25 ते 3 मेट्रिक टन क्षमतेचे अथवा तत्सम क्षमतेचे मिनी ट्रक वाहन उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाच्या कृत्रिम रेतनासाठी आवश्यक असलेल्या वीर्यमात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांच्या वाहतुकीसाठी द्रवनत्राची आवश्यकता असते. जिल्ह्यातील संबंधित केंद्रांना आवश्यकतेनुसार द्रवनत्र व वीर्यमात्रांचा नियमित पुरवठा करता यावा, यासाठी ही वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे.

दरपत्रकासंबंधी वाहतुकीचा संपूर्ण तपशील, आवश्यक वाहनाची क्षमता, वाहतुकीचे स्वरूप तसेच दरपत्रक प्रक्रियेच्या सविस्तर अटी व शर्ती जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त, चंद्रपूर यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतची माहिती चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरही पाहता येईल.

इच्छुक वाहतूक कंत्राटदारांना 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून दरपत्रके सादर करता येणार असून, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दरपत्रके स्वीकारण्यात येतील. संबंधित कंत्राटदारांनी शासकीय सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह आपली सीलबंद दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे विहित मुदतीत सादर करावीत. विहित मुदतीत प्राप्त झालेली दरपत्रके 25 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता उघडण्यात येणार आहेत.

दरपत्रक प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करणे अथवा आवश्यकतेनुसार प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचे सर्व अधिकार जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त, चंद्रपूर यांनी राखून ठेवले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त डॉ. सुरेशकुमार कुंभरे यांनी केले आहे.

००००००

 

No comments:

Post a Comment