29 सप्टेंबरचा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ स्थगित
Ø आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
चंद्रपूर, दि. 25 : जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी 18 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरच्या सहायक आयुक्तांनी दिली आहे.
युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 18 ठिकाणी 29 सप्टेंबर रोजी रोजगार महाकुंभाचे आयोजन नियोजित करण्यात आले होते. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आदर्श निवडणूक आचारसंहिता तातडीने लागू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी नियोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे. रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केलेल्या तसेच सहभागी होण्यास इच्छुक युवक-युवती, उमेदवार आणि संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment