Search This Blog

Thursday, 10 September 2026

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

 ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 10 : जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने ग्रामीण व शहरी विभागातील युवकांसाठी फास्ट फूड आणि केक बनविणे तसेच अगरबत्ती व मेणवत्ती बनविण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण घेण्यात येत आहे.

फास्ट फूड आणि केक बनविणे, या निवासी मोफत प्रशिक्षणाचा कालावधी 12 दिवस असून 17 सप्टेंबर 2026 पासून सदर प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. तर अगरबत्ती आणि मेणबत्ती बनविणे याबाबतचे निवासी मोफत प्रशिक्षण (12 दिवसांचे) 18 सप्टेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. सदर प्रशिक्षण बल्लारपूर रोड, जुने डी.एड. कॉलेज जवळ, बाबूपेठ येथे आयोजित आहे.

प्रशिक्षण घेणा-यांचे वय 18 ते 50 असावे. तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर बँक ऑफ इंडिया आरसेटीकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायातील अनुभवी व्यक्तींना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी 11 ते 5 वाजेपर्यंत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथील अनुप कासवटे (मो.नं 8421009602) आणि अक्षय लांजेकर (मो.नं 9021913751) यांच्याकडे संपर्क करून नाव नोंदवावे व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. हे प्रशिक्षण फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी आहे, असे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment