Search This Blog

Thursday, 10 September 2026

21 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

 

21 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 10 : महिलांच्या तक्रारी/अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येते. या महिन्याचा महिला लोकशाही दिन 21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

ज्या महिलांचे तक्रार/निवेदन/अडचणी/ समस्या वैयक्तीक स्वरुपाचे असतील, अशा तक्रारी महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवसापूर्वी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात दोन प्रतीत अर्ज सादर करावे. प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी संबंधित विभागाला पाठवून प्राप्त तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात येईल.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर व चवथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. या महिन्याचा तिसरा सोमवार 21 सप्टेंबर रोजी येत असल्याने महिला लोकशाही दिन दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त पिडीत महिलांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी सदर महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment