‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
चंद्रपूर,दि.29 : जिल्ह्यात 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्नेहल कासारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. लक्षदीप पारेकर, सहाय्यक संचालक डॉ. संदिप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले तसेच विभागीय समन्वयक सविता गजभिये व रजनी गजभिये आदी उपस्थित हेाते.
कार्यशाळेचा उद्देश व सहभाग : ग्रामीण भागातील आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्य शासनाने 1 एप्रिल 2026 पासून 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला एक निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त जिल्हा घडविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. गावोगावी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.
कार्यशाळेचे संचालन भावना सोडवले यांनी तर आभार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते यांनी मानले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामपंचायत अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, तालुका समूह संघटक, गटप्रवर्तक असे एकूण 200 तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
००००००
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment