Search This Blog

Thursday, 17 September 2026

सेवा संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ



 

सेवा संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

चंद्रपूर, दि. 17 : राज्य शासनाच्या सुचनेप्रमाणे 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज (दि.17) जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.

सदर चित्ररथाद्वारे 15 तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या येाजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात शासकीय आश्रमशाळा समूह योजना, अनुदानित आश्रमशाळा, शबरी आदिवसी घरकुल योजना, आदिवासी मुला/मुलींकरीता शासकीय वसतीगृहे, विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश, महाराष्ट्र टायबल पब्लिक स्कूल सोसायटी एकलव्य मॉडेल निवासी शाळा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृती योजना, सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम येाजना, कन्यादान योजना, सबळीकरण व स्वाभिमान योजना, राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अबुल कलाम अमृत आहार योजनेचा समावेश आहे.

यावेळी आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रेम राठोड, राजीव बोंगिरवार, सुधाकर गौरकर, राजेश धोटकर, सचिन आष्टुनकर, अमोल नवलकर, युवराज चव्हाण, प्रिया मून, तेजश्री चवरे, ज्ञानेश्वर गावंडे, डी.एम. कुडसंगे, प्रफुल धात्रक, ज्ञानेश्वर गोपी, प्रितम मडावी आदी उपस्थित होते.

०००००००

No comments:

Post a Comment