लोकसंवाद
कार्यक्रमातून रोजगाराबाबत मार्गदर्शन
Ø
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
चंद्रपूर,
दि. 24
: राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार,
उद्योजकता व नाविन्यता विभाग हा अतिशय महत्वाचा विभाग
असून बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरावर
रोजगार मेळावे आणि महारोजगार मेळावे आयोजित केले जातात, अशी माहिती कौशल्य विकास
अधिकारी रोशन गभाले यांनी दिली.
सिव्हील लाईन, चंद्रपूर येथील सार्वजनिक गणेश मंडळ (लालबागचा
राजा) आणि जिल्हा माहिती कार्यालय,
चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकसंवाद
या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, संजय वैद्य, उमेश मुदलीयार, भुषण हजारे, तेजस शेंडे, प्रफुल मांदाडे, शेखर हजारे आदी उपस्थित
होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यात उपलब्ध असलेल्या रिक्त् जागा, आदींची माहिती होण्यासाठी रोजगार मेळावे घेतले जातात, असे श्री. गभाले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य उद्दोजकता विकास योजना, आदिवासी कौशल्य विकास केंद्र आदींबाबत माहिती दिली.
00000

No comments:
Post a Comment