Search This Blog

Friday, 3 April 2020

बँकेत गर्दी न करता वेळापत्रकानुसारच पैसे काढावे :डॉ.कुणाल खेमणार


प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत वेळापत्रकानुसार पैसे जमा होणार
चंद्रपूर,दि.3 एप्रिल : प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील 3 महिने (एप्रिलमे आणि जुन 2020) प्रति महिना रुपये 500 इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. यावेळी बँकेत गर्दी न करता वेळापत्रकानुसारच पैसे काढावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केले आहे.
यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम 2 एप्रिल 2020 रोजी सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे.
असे असनार दिवस आणि वेळापत्रक :
काल  बँकेचा 3 एप्रिलला  पहिला दिवस असल्याने  ज्या खाते क्रमांकांचा शेवट 0 किंवा 1 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढण्यात आली.दिवस दुसरा 4 एप्रिलला ज्या खाते क्रमांकाचा शेवट 2 किंवा 3 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.5 तारखेला रविवार आणि 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील.दिवस तिसरा 7 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 4 किंवा 5 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस चौथा 8 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 6 किंवा 7 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस पाचवा 9 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 8 किंवा 9 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.
पुढील दिवशीसुद्धा अशाच प्रकारचे रोटेशन पद्धतीने प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सर्व महिला खातेदारांना वेळापत्रकानुसार पैसे जमा होणार आहे. बँकेत गर्दी न करता पैसे काढण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
000000

लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी बेघर, निराश्रितांसाठी उपयोगी ठरतेय


चंद्रपूर जिल्हयात 1200 पॅक फूडचे वाटप
चंद्रपूर दि.3 एप्रिल : महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित निराधार बेघर व विमनस्क अवस्थेत असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहरराजुरावरोरा व बल्लारपूर या 3 मोठ्या तहसीलच्या ठिकाणी जवळपास 1300 थाळी रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लवकरच अन्य तालुक्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाहीरोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाहीअशा निराश्रितनिराधारबेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची सुविधा शिव भोजन योजनेने संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली.
कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना चंद्रपूर जिल्ह्यासाठी संजीवनी योजना म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिव भोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी योजना उपयोगी ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी या काळात ही योजना अत्यंत प्रभावीपणे जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासन राबवित आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये आगामी काळात शिवभोजन थाळी सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव झाल्यामुळे संचारबंदीच्या काळात ही उपाययोजना चंद्रपूर शहरासह वरोराराजुरा,बल्लारपूरया तीन महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये देखील सुरू झाली आहे. सध्या दीड हजारावर थाळी वाटप केल्या जात आहे. शिव भोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे.
बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या  शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो.प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे.
000000

Thursday, 2 April 2020

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उद्यापासून वेळापत्रकानुसार पैसे जमा होणार

बँकेत गर्दी न करता वेळापत्रक पाळण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.2 एप्रिल : प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील 3 महिने (एप्रिलमे आणि जुन 2020) प्रति महिना रुपये 500 इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम 2 एप्रिल 2020 रोजी सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीमुळे बँक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दिवस आणि वेळापत्रक आखून दिले आहे.
असे असनार दिवस आणि वेळापत्रक :
दिवस पहिला 3 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 0 किंवा 1 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस दुसरा 4 एप्रिलला ज्या खाते क्रमांकाचा शेवट 2 किंवा 3 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.5 तारखेला रविवार आणि 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील.दिवस तिसरा 7 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 4 किंवा 5 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस चौथा 8 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 6 किंवा 7 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.दिवस पाचवा 9 एप्रिलला ज्या खाते क्रमांकांचा शेवट 8 किंवा 9 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल.
000000

रस्त्यावरील गर्दी कमी करा ; घरातील एकानेच आवश्यकता असल्यास बाहेर पडा: जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार


महानगरातील एकट्यावयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना
घरपोच अन्नधान्य सुविधा
Ø  जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
Ø  विदेशातून आलेल्या 204 रुग्णांची नोंद
Ø  152 नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण
Ø  विदेशातून आलेले 52 होम कॉरेन्टाईन
Ø  40 शेल्टर होम मध्ये 3700 परप्रांतीय
Ø  जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद
Ø  खाजगी संस्थानी कोणतीही फवारणी करू नये
Ø  डिस्ट्रिक्ट कोरोना कंट्रोल सेल चंद्रपूर फेसबुक पेजचा वापर करावा
Ø  बाहेर राज्यातील नागरिकांनी 14 पर्यंत कुठेही जाऊ नये
Ø  आवश्यक सुविधांसाठी शासकीय यंत्रणेशी संपर्क करावा
Ø  शिवभोजन सुविधा सक्षमपणे पुरविण्याचे निर्देश
Ø  एप्रिल महिन्यामध्ये एकाच महिन्याचे धान्य वाटप होणार
Ø  खासगी डॉक्टरांनी अन्य साथीच्या आजारावर इलाज करावा
चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या संघर्षामध्ये  शेवटच्या टप्प्यात  आपण सगळे आलो असून  आता 14 एप्रिल पर्यंत शक्यतो घराबाहेर पडणारच नाहीअशा पद्धतीने सर्व नागरिकांनी जबाबदारीचे वर्तन करावे. घरातील एकटाच सुदृढ व्यक्तीने गरज असेल तरच बाहेर पडावे. ज्येष्ठ नागरिकदिव्यांग यांना या काळात बाहेर पडावे लागू नये यासाठी महानगर पालिके मार्फत यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचा वापर त्यांची देखभाल करणाऱ्या मदत करणाऱ्या नागरिकांनी करावा. जिल्ह्यात अद्याप एकही नागरिक पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे सर्व जिल्हा बंद करण्यात आला असून नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह आज संपूर्ण शहरांमध्ये फेरफटका मारला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या कंट्रोल रूम मध्ये बसून जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यांमध्ये सध्या 40 शेल्टर होम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 3700 अन्य राज्यातील नागरिक आहेत. या सर्वांच्या खान पानाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यांनी कुठेही या काळात जाण्याचा प्रयत्न करू नये. असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. यासोबतच अन्य राज्यात थांबलेल्या चंद्रपूरच्या नागरिकांनीदेखील 14 तारखेपर्यंत जिल्ह्यांमध्ये प्रवेश करू नये,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येकाने आहे तिथेच थांबावे. आवश्यक सुविधांसाठी सरकारी यंत्रणेकडे संपर्क साधावाअसेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
      दरम्‍यानआरोग्य यंत्रणेकडून आलेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या साथरोग विभागाने विदेशात गेले असल्याची माहिती असणाऱ्या 72 चंद्रपूरकर नागरिकांची माहिती दिली आहे.मात्र यापैकी बहुतेक नागरिक हे बाहेर जिल्ह्यामध्ये आहेत. या सर्वांची संपर्क साधण्यात आला आहे. ज्यांनी विदेश दौरा केला आहेअशा 204 नागरिकांची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 152 नागरिकांनी 14 दिवसांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण केले आहे. सध्या 14 दिवसांच्या कॉरेन्टाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांची संख्या 52 आहे. काल तपासणीसाठी पाठवलेल्या 13 नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही माहिती न लपविता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
     जिल्ह्यामध्ये सर्दी-खोकला व अन्य साथीचे आजार आढळून येत आहे. या परिस्थितीत नागरिक घाबरले असून खाजगी दवाखाने सुरू करण्यात यावे. तसेच घाबरलेल्या रुग्णांना दिलासा द्यावा. शासकीय यंत्रणेचा गरज पडल्यास अवगत करावेअसे आवाहनही त्यांनी केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी खाजगी संस्थांनी निर्जंतुकीकरण करण्याला मनाई आहे. यासाठी विशेष पद्धतीने निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता असते याचे सर्व अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांनी निवडलेल्या एजन्सींना परवानगी दिलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासनामार्फत येणाऱ्या  सूचनाआदेश तसेच उपाययोजना विषयक व्हिडिओ,माहीती यासाठी जिल्हा प्रशासनाच्या डिस्ट्रिक्ट कोरोना कंट्रोल सेल चंद्रपूर या फेसबुक पेजचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तालुका स्तरावर देखील शिवभोजन सुविधा सुरू होणार असून ही सुविधा सक्षमपणे पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संबंधितांना दिले आहेत.
प्रत्येक महिन्यात त्याच महिन्याचे धान्य वितरण होणार असून माहे एप्रिल मध्ये फक्त माहे एप्रिल महिन्याचेच धान्य वितरित होणार आहे तसेच हे धान्य वितरित झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रति मानसी 5 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. परंतु, जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशाच शिधापत्रिकाधारकांना 5 किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्व देशांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे आगामी धार्मिक दिवसांसाठी धार्मिक कार्य किंवा कोणतेही धार्मिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यासंदर्भात कोणालाही परवानगी नाही.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काम करू इच्छित असणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांना संबंधित तहसीलदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी अधिकृत करावे आणि सर्व स्वयंसेवी संस्थांची व स्वयंसेवी एजन्सींची नाव नोंदणी करून ते दररोज कोणती सेवा पुरवित आहेत.या संबंधित दररोज 5 वाजता अहवाल पाठवणे गरजेचे आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेसहउपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांनी संबंधित भागातील स्थलांतरित आणि अडकलेल्या कामगार कॅम्प ची माहिती घ्यावी.
मनपातर्फे एकट्या,वयोवृध्द व दिव्यांग नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवेसाठी पांडुरंग खडसे 9423417536सुषमा करमरकर 9420142513रेखा पाटील 9096827402रेखा लोणारे 9922620015चिंगुताई मुन 8698216818 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दूध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासन व खाजगी संकलन केंद्रांनी संकलन केंद्रे सुरळीत चालु ठेवावे असे आवाहन सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एन. बी. निंबाळकर यांनी केले आहे.
00000

ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा


चंद्रपूर,दि. 1 एप्रिल: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना करीत आहे तसेच ग्रामपंचायत स्तरावर देखील सर्व ग्रामपंचायत कर्मचारीअंगणवाडीमिनी अंगणवाडी कार्यकर्त्याअंगणवाडी मदतनीसआशा कार्यकर्ती यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृतीस्वच्छता मोहीम राबविणेआरोग्याची काळजी घेणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत करून जीवाची पर्वा न करता करीत आहे. अशा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व विमा देण्याची सुचना राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद यांना केली आहे,अशी माहिती शासन परिपत्रकात  दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या अनुसूची 1ग्रामसूचीमध्ये कलम 45 अन्वये विविध कामांचे विषय दिलेले आहेत. त्यामधील सध्याच्या परिस्थितीत अपंग निराश्रित आणि आजारी असलेल्यांना साहाय्य देणेआरोग्य रक्षण व सुधारणाकोणत्याही संक्रमक रोगाचा उद्रेकफैलाव किंवा पुनरुभ्दवन होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणेकोणतीही नैसर्गिक आपत्ती आली असता रहिवाशांना सहाय्य देणे इत्यादी विषय हाताळण्यात येतात.
या सर्व बाबी कामाचा भाग असल्या तरी देखील सदर कर्मचारी हे आपल्या जीवाची जोखीम पत्कारून हि कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधन व्यतिरिक्त रुपये 1 हजार इतकी प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यात यावी. अशी सूचना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांना दिलेली आहे.
तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत  आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा दिलेला आहे.त्याच धर्तीवर ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 90 दिवसासाठी रुपये 25 लाखाचा विमा जिल्हा परिषद स्तरावर उतरविण्यात येणार आहे.
या योजनांसाठी येणारा खर्च हा 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील बँक खात्यात जमा व्याज रक्कम14 व्या वित्त आयोगाअंतर्गत मागील 5 वर्षातील शिल्लक असलेला अखर्चित निधीशासन निर्णय क्रमांक जीपीडीपी 2019,प्र.क्र. 38पंरा-6दि.28 मे 2019 मधील मुद्दा क्रमांक 3.6 मध्ये नमूद केल्यानुसार आरोग्यउपजीविका यासाठी वित्त आयोगाच्या निधीतील 25 टक्के तरतूदजिल्हा परिषद सेस फंड या नुसार प्राधान्य क्रमानुसार भागविण्यात येणार आहे.
00000