Search This Blog

Monday, 1 June 2020

कोरोनामुळे मंदावलेल्या चंद्रपूर एमआयडीसीला गती देण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचे आवाहन


कोरोनामुळे मंदावलेल्या चंद्रपूर एमआयडीसीला गती देण्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचे आवाहन
एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राच्या कामकाजाचा घेतला आढावा
ब्रम्हपुरी येथे एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करण्याची सूचना
चंद्रपूर, दि. 1 जून : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मजुरांची कमतरता, सोशल डिस्टनसिंगसंचारबंदीयामुळे मंदावलेल्या जिल्ह्यातील उद्योगव्यवसायाला गती देण्यासाठी एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने व्यापारी उद्योजकांच्या मदतीला सकारात्मकपणे पुढे यावेएमआयडीसीमध्ये नव्या उद्योजकांना चालना देण्यासाठी नव्या धोरणाची आखणी करावीरिकामे भूखंड इच्छुकांना सहज उपलब्ध करावेअशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज आयोजित बैठकीत केल्या.
या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर,आ. प्रतिभा धानोरकरआ. किशोर जोरगेवारजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेयांच्यासोबतच जिल्ह्यातील विविध व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधीव्यापारीउद्योजक उपस्थित होते.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाची सद्यस्थिती व कोरोना आजारा पूर्वी जिल्ह्यात असणाऱ्या व्यापार उद्योगाची परिस्थितीयाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या बैठकीत खासदार सुरेश धानोरकर व आमदार किशोर जोरगेवार यांनी एमआयडीसी परिसरातील जे भूखंड वापरात नाही. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. उद्योग-व्यवसायात आवड असणाऱ्या तरुणांना याबाबतची माहिती पोहोचत नाही. त्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने लक्ष वेधण्याचे आवाहन त्यांनी केले. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी भानुदास यादव या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा भूखंड उपलब्ध केला जातोअसे स्पष्ट केले. तथापिजिल्हास्तरावर हा भूखंड सहज सुलभतेने उपलब्ध व्हावायासाठी एमआयडिसी संदर्भातील सर्व निर्णय चंद्रपूर किंवा नागपूर या ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा यावेळी एमायडिसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांनी व्यक्त केली.
येथील राईस मिलचे व्यवस्थापक श्री. भटकर यांनी यावेळी अधिक अंग मेहनतीचे काम करणारे अन्य राज्यातील मजूर गावाला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाला झळ पोहोचत असल्याचे लक्षात आणून दिले. स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींचा आग्रह आहे. मात्र अंग मेहनतीचे काम करण्याकडे स्थानिक कामगारांचा कल नसतो. ही बाब त्यांनी यावेळी लक्षात आणून दिली. तथापिमोठ्या प्रमाणात एमआयडीसी उद्योग समूहामध्ये रिक्त असणाऱ्या जागांवर स्थानिक कामगारांना संधी देण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री व अन्य लोकप्रतिनिधींनी दिले.
एमआयडीसी परिसरात सध्या नव्याने उद्योग व्यवसायात येणाऱ्या तरुणांना प्रधानमंत्री रोजगार योजना व मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी बँक प्रतिनिधींना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केली. या चर्चेत मधुसूदन रुंगठामेघनाथ जॉनी व उपस्थित बँकेच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.
एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात असणाऱ्या मोठ्या उद्योगांना पूरक असे व्यवसाय उभारण्याची संधी द्यावी व सिमेंट कारखान्यांना स्थानिक स्तरावरून पूरक साहित्य घेण्याचे निर्देशीत करावेअशी मागणीही एमआयडीसी व्यापारी प्रतिनिधींनीनी केली. जिल्ह्यातील प्रमुख सिमेंट कारखान्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासन पुरस्कृत फ्लाय अॅश क्लस्टर पुनर्जीवित करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. केंद्र शासनाकडून काही निधी आला असून उर्वरित निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. राईस मिल उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात एक सर्वंकष धोरण बनविण्यात यावे,तसेच जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीना गतिशील करण्यात यावेब्रह्मपुरी येथे एमआयडीसी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावीआदी विषयांवर देखील यावेळी चर्चा झाली.
00000

जिल्ह्यात एक आणखी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण संख्या 23

जिल्ह्यात एक आणखी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 23
Ø  एक कोरोना मुक्त रुग्णाला सुटी
Ø  आतापर्यंत 13 रुग्ण कोरोना मुक्त
Ø  दोन्ही मृत व्यक्तीचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह
Ø  अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 10
Ø  73 हजारावर नागरिक जिल्ह्यात दाखल
चंद्रपूरदि. 1 जून: मुंबई  येथुन आलेला युवकाचा स्वॅब नमुना 31 मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1जूनला 23 झाली आहे. यापैकी,जिल्ह्यात दिनांक 23 मे रोजी आढळलेली कोरोना पॉझिटिव्ह बाबुपेठ परिसरातील युवती कोरोना मुक्त झाली असून तिला आज सुटी देण्यात आली आहे. सध्या 13 रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण 10 आहेत.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण भरती असून 9 रुग्णांना कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 10 आहे.या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
दरम्यानदिनांक 30 मे रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अलगीकरण कक्षात दोघांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एकाचे आकस्मिक तर एका रुग्णाने अलगीकरण कक्षात आत्महत्या केली होती. मृत्यूपश्चात या दोघांचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दोघांच्या स्वॅबचा अहवाल आज प्राप्त झाला असून दोन्ही अहवाल निगेटिव्ह आहेत ,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिली आहे.
कोविड-19 संक्रमित 23 रुग्णांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -1,मुंबई-4, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -2, नाशिक -3, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत -5 आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहिती नुसारजिल्ह्यामध्ये 966 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 23 नमुने पॉझिटिव्ह, 883 नमुने निगेटिव्ह तर 60 नमुने प्रतीक्षेत आहेत.
दिनांक 1 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 82 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 3 हजार 416 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.तालुकास्तरावर 306 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तरजिल्हास्तरावर 360 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 73 हजार 332 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 64 हजार 676 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 8 हजार 656 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन ) मध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेचआयएलआयसारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआयसारीचे 11 नमुने घेतले असून आयएलआयसारीच‌े 10 नमुने निगेटिव्ह आले आहेत.तरएक नमुना प्रतीक्षेत आहे.
चंद्रपूरमध्ये 2 मे ( एक रुग्ण )13 मे ( एक रूग्ण), 20 मे ( एकूण 10 रूग्ण ), 23 मे ( एकूण 7 रूग्ण) व 24 मे ( एकूण रूग्ण 2 ), 25 मे ( एक रूग्ण ), 31 मे ( एक रुग्ण ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण 23 झाले आहेत.आता पर्यत 13 रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 23 पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या 10 आहे.
00000

शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी बँकेशी तात्काळ संपर्क साधावा : ना. वडेट्टीवार


शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी बँकेशी तात्काळ संपर्क साधावा : ना. वडेट्टीवार
एक एप्रिलपासून जिल्ह्यात 2.73 कोटीचे कर्ज वाटप
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. जून : खरिपाचा हंगाम तोंडावर असून  बँकांमध्ये  पोहोचून शेतकऱ्यांनी  पिक कर्ज घ्यावेत. राज्य शासनाने जवळपास सर्वच शेतकऱ्यांना  कर्ज वाटप करण्याबाबतचे निर्देश बँकांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधून कर्ज उपलब्ध करुन घ्यावेअसे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन,  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार  यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात  जिल्हाभरातील बँक प्रतिनिधी  कृषी विभाग  व  विविध महामंडळांच्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी  शेतकऱ्यांना कर्ज वाटप करतांना अटी व शर्ती मध्ये न अडकवता पतपुरवठा करावा, असे आवाहन केले.
        या बैठकीला खासदार  सुरेश उर्फ बाळू धानोरकर ,आ. किशोर जोरगेवारआ. सुभाष धोटेआ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते .
राज्य शासनाने 2019 मध्ये कर्जमाफी योजना केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या  बँकांना दिल्या आहेत. कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायचे राहिलेअसेल तरीही त्यांना कर्ज देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पतपुरवठा सुरळीत व्हावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 एप्रिल पासून 31 मे पर्यंत 273.82 लाख कर्ज वाटप करण्यात आले आहेअशी माहिती यावेळी शिखर बँकेचे समन्वयक एस.एन.झा यांनी दिली.
यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा ज्योतिबा फुले महामंडळसंत रोहिदास महामंडळअण्णासाहेब साठे महामंडळअण्णासाहेब पाटील महामंडळवसंतराव नाईक महामंडळ यांच्या मार्फत होणाऱ्या पतपुरवठ्याचाही आढावा घेतला. विविध क्षेत्रातील लोकांना अर्थपुरवठा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या या महामंडळाकडून राज्य शासनाला मोठी अपेक्षा असून त्यांनी योग्य प्रमाणात पतपुरवठा करावा,अशी सूचना देखील यावेळी त्यांनी केली.
कोरोना आजाराच्या प्रादुर्भावाच्या काळात शेतकऱ्यांना पतपुरवठ्यामुळे पुढच्या हंगामाचे नियोजन करता आले नाही असे व्हायला नको. यासाठी सर्व अडथळे दूर करण्याबाबतची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना :
राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार करून आता सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनासह सर्वच आजारासाठी आता जवळपास सर्वांना या योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ मिळणार आहे. कोरोनासाठी या योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांना देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड-19 आजारासाठी उपचार परवानगी देण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे,केशरीअंत्योदयअन्नपूर्णा योजना ,शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबे तसेच बांधकाम कामगारांना देखील लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजने मध्ये सामाजिक आर्थिक व जात निहाय जनगणना 2011 मधील नोंदीत लाभार्थी कुटुंबे समाविष्ट असून ग्रामीण भागासाठी स्वाभाविक निकष व शहरी भागासाठी व्यावसायिक निकष ठेवण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून पिवळीअंत्योदयअन्नपूर्णाकेशरीशुभ्र शिधापत्रिकापात्र ठरविण्यात आली आहे.31 जुलै 2020 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावाअसे आवाहनही पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेच्या पोस्टरचे अनावरण पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
00000

वेकोली पुनर्वसनाच्या संदर्भात गावकऱ्यांनी आठ दिवसात अंतिम प्रस्ताव सादर करावेत : ना. वडेट्टीवार

वेकोली पुनर्वसनाच्या संदर्भात गावकऱ्यांनी
आठ दिवसात अंतिम प्रस्ताव सादर करावेत : ना. वडेट्टीवार
वेकोली व गावकऱ्यांसोबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांची बैठक
चंद्रपूर, दि. 1 जून :चंद्रपूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमुळे झालेल्या गावांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात पाच वर्ष प्रश्न रेंगाळत राहणे योग्य नाही. आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील पुनर्वसित घरांच्या संख्या याबाबतचा अंतिम प्रस्ताव पुढील आठ दिवसात सादर करावा. त्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईलअसे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापनइतर मागासओबीसी कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबतचे भिजत घोंगडे आणखी किती काळ आपण सुरू ठेवणार आहात. त्यामुळे वेकोली व गावकरी यांच्यातील कोंडी सोडण्यासाठी प्रशासनाने पुढच्या आठ दिवसात अंतिम निर्णय घ्यावाअसे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीत पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिले. या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर ,आ. किशोर जोरगेवारआ. सुभाष धोटेआ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड चंद्रपुर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास चंद्रसिंग, बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस.सी.डे, वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक प्रचालन बी.एन.शर्मा तसेच अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मौजा मसाळा तुकुममौजा भटाळीआदी गावातील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चिला गेला.मूळ रहिवाशांवर अन्याय व्हायला नको. सोबतच गावातील रहिवाशांची संख्या अधिक कशी झाली याचे स्पष्टीकरण सुद्धा प्रस्तावात असावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांनी देखील सहभाग घेतला. घरांच्या पुनर्वसनाचा सोबतच शेताच्या संदर्भात निर्णय घेताना समुहाबाबतचा दृष्टिकोण वेकोलीने समोर ठेवावा. काही एकरांचे हस्तांतरण व काही एकरांवर मालकी अशी परिस्थिती ठेवू नये अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या बैठकीला अधिकाऱ्यांसोबतच दोन्ही गावचे गावकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.या गावकऱ्यांचे म्हणणे देखील यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले.
या बैठकीनंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगारांची भरती करण्यात यावी. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावाअशी मागणी केली.
00000

पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची बैठक

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राथमिकता द्या
'मिशन बिगीन अगेनसाठी लोकप्रतिनिधींच्या प्रशासनाला सूचना
पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची बैठक
चंद्रपूर, दि. 1 जून : जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना 3 जून ते 30 जून पर्यंतच्या मिशन बिगीन अगेनची अर्थात लॉकडाऊन शिथील करताना जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्यात यावी. तसेच शेतकरी व हातच्या कमाईवर रोजचे पोट असणाऱ्या कामगारांच्या हिताचे देखील यामध्ये लक्ष वेधण्यात यावेअशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील महिन्याभराच्या काळातील लॉकडाऊन संदर्भातील नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच जारी होणार आहे. यासाठी आज सकाळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची एक तातडीची बैठक पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली. या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकरआ. किशोर जोरगेवारआ. सुभाष धोटेआ. प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरेजिल्हाआरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी दैनंदिन व्यवहारात अडचण येणार नाहीअशा पद्धतीच्या वाहतूक व्यवस्थेची परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सूचना केली. ऑटोचालकटुव्हिलर चालकखाजगी वाहन धारकयांच्या काही मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र जिल्ह्यांमधील प्रत्येक नागरिकांनी यापुढे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क वापरण्याची सवय लावणे अनिवार्य करण्याबाबत सर्व लोकप्रतिनिधींनी एक मत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यांमधील नागरिकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी आयुष मंत्रालयामार्फत औषधी वितरणाच्या संदर्भात प्रयत्न करण्याबाबतची सूचना केली.नागरिकांनी कोरोना या आजारावर केवळ एकमेव उपचार म्हणजे शक्यतो घराबाहेर अत्यावश्यक कामाशिवाय न पडणे आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षाखालील मुलांची देखील काळजी घेण्याबाबत अशा सूचना केल्या.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे यांना तातडीने नवीन कोरोना चाचणीची प्रयोगशाळा सुरू करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचा उपयोग चंद्रपूर सोबतच गडचिरोली जिल्ह्याला देखील व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोबतच जिल्ह्यामध्ये सैन्य दलातील निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये आवश्यक तेथे सहभागी करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणखी बळकट करून प्रत्येक नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवश्यक सूचना औषधोपचार व त्याचा ताण तणाव कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत यांना करण्यात आली.
00000