Search This Blog

Monday, 1 June 2020

वेकोली पुनर्वसनाच्या संदर्भात गावकऱ्यांनी आठ दिवसात अंतिम प्रस्ताव सादर करावेत : ना. वडेट्टीवार

वेकोली पुनर्वसनाच्या संदर्भात गावकऱ्यांनी
आठ दिवसात अंतिम प्रस्ताव सादर करावेत : ना. वडेट्टीवार
वेकोली व गावकऱ्यांसोबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांची बैठक
चंद्रपूर, दि. 1 जून :चंद्रपूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमुळे झालेल्या गावांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात पाच वर्ष प्रश्न रेंगाळत राहणे योग्य नाही. आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील पुनर्वसित घरांच्या संख्या याबाबतचा अंतिम प्रस्ताव पुढील आठ दिवसात सादर करावा. त्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईलअसे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापनइतर मागासओबीसी कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबतचे भिजत घोंगडे आणखी किती काळ आपण सुरू ठेवणार आहात. त्यामुळे वेकोली व गावकरी यांच्यातील कोंडी सोडण्यासाठी प्रशासनाने पुढच्या आठ दिवसात अंतिम निर्णय घ्यावाअसे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीत पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिले. या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर ,आ. किशोर जोरगेवारआ. सुभाष धोटेआ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिलेवेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड चंद्रपुर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास चंद्रसिंग, बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस.सी.डे, वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक प्रचालन बी.एन.शर्मा तसेच अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मौजा मसाळा तुकुममौजा भटाळीआदी गावातील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चिला गेला.मूळ रहिवाशांवर अन्याय व्हायला नको. सोबतच गावातील रहिवाशांची संख्या अधिक कशी झाली याचे स्पष्टीकरण सुद्धा प्रस्तावात असावेअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांनी देखील सहभाग घेतला. घरांच्या पुनर्वसनाचा सोबतच शेताच्या संदर्भात निर्णय घेताना समुहाबाबतचा दृष्टिकोण वेकोलीने समोर ठेवावा. काही एकरांचे हस्तांतरण व काही एकरांवर मालकी अशी परिस्थिती ठेवू नये अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या बैठकीला अधिकाऱ्यांसोबतच दोन्ही गावचे गावकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.या गावकऱ्यांचे म्हणणे देखील यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले.
या बैठकीनंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी वेकोलिमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगारांची भरती करण्यात यावी. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावाअशी मागणी केली.
00000

No comments:

Post a Comment