Search This Blog

Saturday 13 June 2020

15 जूनला जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला लोकशाही दिन

15 जूनला जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला लोकशाही दिन
चंद्रपूर दि.13 जून: शासन निर्णय दिनांक 4 मार्च 2013 अन्वये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत महिला लोकशाही दिन 15 जून 2020  रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात येत आहे.
या दिनानिमित्त सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत महिलांची तक्रारनिवेदन वैयक्तिक स्वरुपाचे स्विकारण्यात येईल.न्याय प्रविष्ठ प्रकरणेसेवा विषयकआस्थापना विषयक बाबी अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment