Search This Blog

Tuesday 23 June 2020

जिल्ह्यातील ॲक्टिव बाधितांची संख्या 18

जिल्ह्यात आतापर्यंत 79 हजारांवर नागरिक दाखल
जिल्ह्यातील ॲक्टिव बाधितांची संख्या 18;
43 बाधित कोरोना मुक्त
Ø  चंद्रपूर शहरात आणखी 4 नागरिक पॉझिटीव्ह
Ø  आतापर्यतची बाधित संख्या 61
Ø  971 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
Ø  4 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू
चंद्रपूरदि.23 जून: चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे 3 व अन्य एक 31 वर्षीय नागरिकाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या 61 झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या अॅक्टिव्ह बाधित यांची संख्या फक्त 18 असून आतापर्यंत 43 नागरिक कोरोना आजारातून बरे झाले आहे.
       हैदराबाद शहरातून 16 जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( 40 वर्षीय ) वडील ( 47 वर्षीय ) व मुलगा ( 21 वर्षीय  )बाधित असल्याचा अहवाल आला आहे. या तिघांचेही स्वॅब नमुने 22 जून रोजी घेण्यात आले होते. 23 जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
तर बिनबावार्ड परिसरातील अन्य 31 वर्षीय बाधित व्यक्ती सिकंदराबाद येथून 19 जून रोजी परत आला होता. आल्यापासून ते गृह अलगीकरणात होते. 22 जून रोजी त्यांचा स्वॅब नमुने घेण्यात आला. 23 रोजी अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे पुढे आले.
जिल्ह्यात एकूण 26 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 21 कंटेनमेंट झोन 14 दिवस पुर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. सध्या 5 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. 26 कंटेनमेंट झोन मधील आयएललाय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी एक नमुना पॉझिटिव्ह, 57 नमुने निगेटिव्ह तर एक नमुना अनिर्णयित आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोनपोंभूर्णा दोनसिंदेवाही दोनमुल तीनब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीनवरोरा दोनराजुरा दोनमुलभद्रावतीब्रह्मपुरी,कोरपणा,नागभिड प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ दोनबालाजी वार्ड भिवापूर वार्ड शास्त्रीनगर प्रत्येकी एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकबिनबा वार्ड एकलुंबिनी नगर 3 बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 61 वर गेली आहे.
कोविड-19 संक्रमित 61 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-4, सिकंदराबाद-1,मुंबई-10, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.
जिल्ह्यात 3 हजार 328 स्वॅब नमुने तपासणीस पाठविलेले होते. यापैकी 61 नमुने पॉझिटिव्ह, 2 हजार 978 नमुने निगेटिव्ह, 267 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर 22 नमुने अनिर्नयित आहेत.
जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणा विषयक माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 971 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 379, तालुकास्तरावर 280, तर जिल्हास्तरावर 312 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79 हजार 690 नागरिक दाखल झालेले आहेत. 74 हजार 974 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच 4 हजार 716 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण बाधित), 24 मे ( एकूण बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित) आणि 23 जून (एकूण बाधित चार )अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 61 झाले आहेत. आतापर्यत 43 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  61 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 18 आहे.
00000

No comments:

Post a Comment