Search This Blog

Monday 15 June 2020

कोविड-19 माहिती पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

कोविड-19 माहिती पुस्तिकेचे
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन
चंद्रपूर,दि. 15 जून: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासना अंतर्गत विविध उपाय योजना करण्यात आले आहे. या उपाययोजने विषयी माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घराघरात पोहोचविता यावी यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात कोविड-19 माहिती पुस्तिका जिल्हा प्रशासन व टाटा ट्रस्टच्या सहयोगाने तयार करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे विमोचन 15 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरजिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाकेचंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशन कॅन्सर हॉस्पिटलचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.सुमित पांडे, आरोग्य शिबीर व्यवस्थापक सुरज साळुंके,सचिन दळवी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. तसेच दैनंदिन काम करत असताना शारीरिक अंतर राखणेमास्क कसा वापरावासार्वत्रिक खबरदारीरोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आयुर्वेदिक सल्ला इत्यादी  माहिती या पुस्तिकेत  देण्यात आली आहे.
नागरिकांनी कोविड-19 माहिती पुस्तिकेचा वापर करुन कोरोना विषाणू प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यातअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

No comments:

Post a Comment