Search This Blog

Monday, 15 June 2020

जनतेने आरटीओ संदर्भातील कामे ऑनलाइन पार पाडावी

जनतेने आरटीओ संदर्भातील कामे ऑनलाइन पार पाडावी
चंद्रपूर, दि. 15 जून : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहनाची नोंदणीअनुज्ञप्तीचे नूतनीकरणपत्ता बदलीपरवान्याची कामे इत्यादी कामे चालू असून सदर काम पूर्णतः ऑनलाईन स्वरुपात चालू राहतील.
अभ्यागंताना अत्यावश्यक काम असल्यास ऑनलाइन पूर्व परवानगी घेऊनच कार्यालयात यावे. तसेच जनतेनी आपली कामे ऑनलाइन स्वरूपातच पार पाडावी. कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
00000

No comments:

Post a Comment