Search This Blog

Thursday 18 June 2020

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या संस्थांना संधी

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी
काम करणाऱ्या संस्थांना संधी
जिल्हा महिला व बालविकास विभागाचे आवाहन
चंद्रपुरदि.18 जून: जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत वन स्टॉप क्राईसेस सेंटर ही योजना चंद्रपुर येथे सुरू होत असून वन स्टॉप सेंटर योजनेच्या मार्गदर्शिकामध्ये इम्प्लिमेंटींग एजन्सीच्या नियुक्तीबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर इम्प्लिमेंटींग एजन्सीला या योजनेत पिढीत महिलांना प्रशिक्षण देणेकर्मचारी क्षमता बांधणी व तांत्रिक मदत करणे इत्यादी स्वरूपाचे सदर एजन्सीच्या कामाचे स्वरूप राहिल.
या असणार अटी व शर्ती:
वन स्टॉप सेंटर या योजनेच्या व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार इम्प्लिमेंटींग एजन्सीला कार्यवाही करावी लागेल. समितीच्या निर्देशानुसार कामकाज न केल्यास एजन्सीची सेवा बंद करण्यात येईल.
इम्प्लिमेंटींग एजन्सी करीता आवेदन करणाऱ्या संस्थेला अन्यायग्रस्तसंकटग्रस्त,पिडीत महिलांच्या हिताच्या क्षेत्रात काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणे कर्मचारी क्षमता बांधणी व तांत्रिक मदत या क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
आवेदन करणाऱ्या संस्थेच्या घटना व नियमावलीमध्ये अन्यायग्रस्त,संकटग्रस्तपिडीत महिलांसाठी कार्य करण्याचा उल्लेख असलेल्या संस्थेलाच आवेदन करता येईल. तसेच सदर कामाबाबत 10 मिनीटाचे सादरीकरण करावे लागेल.
इम्प्लिमेंटींग एजन्सी करीता आवेदन करणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधीकाऱ्यांनी मंजूर केलेला ठराव जोडण्यात यावा.अटी व शर्तींचे पालन करण्यासंबंधी रूपये 100 च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
आवेदन करणारी संस्था (अ.) संस्था नोंदणी अधिनीयम 1860 (ब) सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत आवश्यक असणार आहे.संस्था काळ्या यादीत समावेश नसल्याबाबतचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
निती आयोगाची नोंदणी असणे आवश्यक आहे.संस्था ही चंद्रपुर जिल्ह्याअंतर्गत नोंदणीकृत असावी. इम्प्लिमेंटींग एजन्सी करीता नियुक्त झालेल्या संस्थेचे व पदाधीकाऱ्यांचे पोलीस विभागाकडून चारीत्र्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येईल. त्यामध्ये पदाधीकाऱ्यांवर फौजदारी किंवा अन्य प्रकारच्या गुन्हा आढळल्यास सदर संस्थेचे नियुक्ती रद्द करण्यात येईल.
आवेदन अर्ज जाहीरातबातमीपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी चंद्रपुरजुना कलेक्टर बंगला,आकाशवाणी केंद्राच्या मागे सिव्हील लाईनचंद्रपुर येथे सादर करावा. विलंबाने आलेल्या आवेदन पत्राचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
00000

No comments:

Post a Comment