Search This Blog

Saturday, 20 June 2020

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचा आज ब्रम्हपुरी दौरा

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचा
आज ब्रम्हपुरी दौरा
मंगळवार व बुधवारला चंद्रपूर येथे बैठकी
चंद्रपूरदि. 20 जून: राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार आज येथे एक पूर्ण दिवसाच्या दौऱ्यावर असणार आहेत.
रविवारी सकाळी विश्रामगृहावर ब्रह्मपुरी येथे कोविड संदर्भातील तालुका स्तरीय आढावा ते घेणार आहेत. दुपारी 2.30 नंतर कॉग्रेस तथा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. सायंकाळी ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीला ते प्रयाण करतील व सोमवारी तिथेच मुक्काम असणार आहे.सोमवारी ते गडचिरोलीला दिवसभर असतील.
मंगळवारी 23 जून रोजी गडचिरोली वरून त्यांचे सकाळी तहसील कार्यालय सावली येथे साडेदहा वाजता आगमन होणार आहे. सावली येथील अधिकाऱ्यांसोबत कोरोना उपाययोजना आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर सावली येथील विश्रामगृहावर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व अभ्यागतांसोबत भेटी व चर्चेचा कार्यक्रम ठेवला आहे. दुपारी अडीच वाजता ते सावली येथून चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे कोरोना संदर्भातील विकासकामांचा आढावा नियोजन भवन चंद्रपूर येथे घेणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री हिराई विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असून बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30 वाजता नियोजन भवनमध्ये आदिवासी विकास विभागमार्केटिंग फेडरेशनअन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सकाळी 11 ते एक वाजेपर्यंतचा वेळ राखून ठेवण्यात आलेला आहे. दुपारी साडेतीन वाजता चंद्रपूर येथून माजरी तालुका भद्रावती कडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:15 वाजता माजरी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांचे वरोरा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतील. सायंकाळी वाजता वरोरा येथून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम असणार आहे.
00000

No comments:

Post a Comment