Search This Blog

Sunday 28 June 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 28

चंद्रपूर जिल्ह्यातील उपचार घेत
असलेल्या बाधितांची संख्या 28
                एकूण बाधितांची संख्या 81; 53 कोरोना मुक्त
Ø  आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा
Ø  आतापर्यंत जिल्ह्यात 82 हजारांवर नागरिक परतले
Ø  तीन हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत
चंद्रपूरदि. 28 जून: जिल्ह्यात आतापर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या 81 आहे. यापैकी 53 बाधित कोरोना मुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या (ॲक्टीव्ह) बाधितांची संख्या 28 आहे.या 28 बाधितांपैकी 24 बाधित कोविड केअर सेंटरवन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले आहे. तर चार बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.जिल्ह्याचा डबलींग रेट 14.0 आहे.
जिल्ह्यामध्ये आरोग्य सेतू ॲप अंतर्गत तीन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य सेतू ॲप वापरणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा नागरिकांनी 1921 क्रमांकाचा वापर करून डेटा असेसमेंट करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
22 कंटेनमेंट झोन बंदसध्या 13 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 35 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 22 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. 13 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे. तर एक कंटेनमेंट झोन  सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. आजपर्यंत एकूण 35 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्हएक पॉझिटिव्ह तर एक नमुना अनिर्नयित आहे.कंटेनमेंट झोनमधील सर्व आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत आहे. कॅच दि कोरोना व्हायरस या मोहिमेअंतर्गत एकूण 21 बाधित आढळले आहे.
स्व मुल्यांकन (सेल्फ असेसमेंट)ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी)अंदाज तसेच ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहेत्या ठिकाणची तपासणी (फोरकास्टइमर्जिंग हॉटस्पॉट) विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्व मुल्यांकनाद्वारे (सेल्फ असेसमेंट) 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 34 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 34 नागरिकांपैकी चार निगेटिव्ह, 30 अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ निकटताद्वारे (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) 139 नागरिकांशी संपर्क केलेला असून  109 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 109 नागरिकांपैकी 10 पॉझिटिव्ह, 78 निगेटिव्ह तर  21 नमुने प्रतीक्षेत आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू अंदाज (फॉरकास्ट)तसेच इमर्जिंग हॉटस्पॉट अर्थात ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहेत्या ठिकाणी 64 गावांमध्ये 88 पर्यवेक्षक व 800 पथकांद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी अंतर्गत
40 हजार 806 घरे, 1 लाख  85 हजार 197 लोकसंख्येच्या माध्यमातून 26 हजार 615 दुर्धर आजार  (कोमॉरबीडीटी)  असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 159 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 126 स्वॅब घेण्यात आले आहे.
बाधितांची तपासणी पूर्वीची अलगीकरण व लक्षणांवरूनची माहिती:
जिल्ह्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह बाधितांची तपासणी पूर्वीची अलगीकरण व लक्षणांवरून संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण कोविड-19 पॉझिटिव्ह 81 बाधित आहेत. यापैकी गृह अलगीकरणातील 31 बाधितसंस्थात्मक अलगीकरणातील 32 बाधितएकूण सारी लक्षणे असलेले 3 बाधित तर आयएलआय लक्षणे असलेले 15 बाधित आहेत.
कोविड-19 संक्रमित 81 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-2, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-8, नागपूर-2, अकोला-2, मुंबई-13, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -5, औरंगाबाद -3, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-7, संपर्कातील व्यक्ती - 16 आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7, बल्लारपूर दोनपोंभूर्णा दोनसिंदेवाही दोनमुल तीनब्रह्मपुरी 12, नागभीड चारवरोरा-पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चारवरोरा चारराजुरा दोनमुल-एकभद्रावती-तीनब्रह्मपुरी-7, कोरपणानागभिडगडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ तीनबालाजी वार्ड दोनभिवापूर वार्ड एक शास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 81 वर गेली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 240 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 81 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 708 नमुने निगेटिव्ह, 419 नमुने प्रतीक्षेत तर 32 अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 838 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 286 नागरिक,तालुकास्तरावर 230 नागरिक तरजिल्हास्तरावर 322 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 82 हजार 181 नागरिक दाखल झाले आहेत. 78 हजार 671 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 3 हजार 510 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित) आणि 27 जून (एकूण 7 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 81 झाले आहेत. आतापर्यत 53 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  81 पैकी सध्या उपचार घेत असलेल्या (ॲक्टीव्ह)  बाधितांची संख्या आता 28 आहे.
00000

No comments:

Post a Comment