Search This Blog

Friday 26 June 2020

आत्मभान अभियानातील फोन इन कार्यक्रमाचे 27 जून शनिवार सकाळी 10.30 ला प्रसारण

आत्मभान अभियानातील फोन इन कार्यक्रमाचे
27 जून शनिवार सकाळी 10.30 ला प्रसारण
ऐका ! ना.वडेट्टीवार यांच्या सोबतचा
कोरोना आणि प्रशासनाची तयारी विषयीचा संवाद
चंद्रपुर,दि. 26 जून: जिल्हा प्रशासना अंतर्गत कोरोनाच्या  काळात जनजागृती विषयीची माहिती घरोघरी व साध्यासोप्या भाषेमध्ये नागरिकांना माहिती व्हावी यासाठी आत्मभान अभियान सुरू केलेले आहे. या आत्मभान अभियानातील महत्त्वपूर्ण फोन इन कार्यक्रमात राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर नागरिकांशी संवाद साधला होता या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 27 जून शनिवार ला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी वरून होणार आहे.
जिल्ह्यामधील अलगीकरणाची व्यवस्थाबाहेर अडकलेल्या मजुरांना सुखरूप स्वगावी पोहोचविणेउद्रेकाच्या काळातील अतिरिक्त बेडची व्यवस्थाकोरोनाच्या काळामध्ये शेतकरीव्यावसायिक त्यांच्यासाठी घेण्यात आलेले निर्णय याबद्दल प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबत नागरिकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नावर थेट आकाशवाणी स्टुडीओतून ते जनतेशी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला होता.
आकाशवाणी चंद्रपूरची निर्मिती असणाऱ्या या फोन-इन कार्यक्रमाचे आत्मभान अभिनातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 27 जून शनिवारी रोजी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून होणार आहे. नागरिकांनी आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या 103 मेगाहर्डस वर  प्रसारण ऐकावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment