Search This Blog

Friday 26 June 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यतची बाधित संख्या 72

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यतची बाधित संख्या 72;
जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 24
Ø  जिल्हात एकाच दिवशी 10 बाधिताची भर
Ø  आतापर्यंत 48  बाधित कोरोना मुक्त
Ø  835 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
चंद्रपूर,दि.26 जून: जिल्ह्यामध्ये 25 जून गुरुवारी एकाच दिवशी 10 कोरोना बाधिताची भर पडली आहे. गुरुवारी सायंकाळी आलेले दोन व रात्री उशिरा आलेले आठ अशा एकूण दहा बाधितांचा यात समावेश आहे. दहा बाधितामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित संख्या 72 झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा आणखी आठ बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
यामध्ये वरोरा येथील  सुभाष नगर वार्ड मधील औरंगाबाद येथून परत आलेल्या 19 व 25 वर्षीय दोन बहिणींचा समावेश आहे. 24 तारखेला त्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.25 जूनला रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वरोरा तालुक्यातील वाघनख या गावातील मुंबईवरून परत आलेले व गृह अलगीकरणात असणारे 64 वर्षीय पती व 54 वर्षीय पत्नी दोघांचे 24 तारखेला घेतलेले स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
वरोरा शहरातील अभ्यंकर नगर परिसरातील 32 वर्षीय महिला व 37 वर्षीय पुरुष हे हैद्राबादवरून 22 तारखेला परतले होते. 22 तारखेपासून गृह अलगीकरणात होते. त्यांचे 24 तारखेला स्वॅब घेण्यात आले होते. ते देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
     आरोग्य सेतू ॲप वरील नोंदीच्या माध्यमातून वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असणारे 65 वर्षीय व्यक्तीदेखील पॉझिटिव्ह ठरले आहे. त्यांचा स्वॅब नमुना 24 तारखेला घेण्यात आला होता.तर चंद्रपूर शहरातील पठाणपुरा भागातील एका पॉझिटिव्ह बाधिताच्या 27 वर्षीय पत्नीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. हैदराबाद येथून शहरात परतल्याची त्याची नोंद आहे. हा युवक 16 जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होता.
       तर चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील 27 वर्षीय युवतीचा स्वॅब अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळ येथून 21 जून रोजी परत आल्यानंतर ही युवती गृह अलगीकरणात होती. काल तिचा स्वॅब नमुना घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आतापर्यंत 48 बाधित कोरोना मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा डबलिंग रेट 19.6 आहे.
सेल्फ असेसमेंटब्लूटूथ प्रॉक्सीमिटीफोरकास्ट इमर्जिंग हॉटस्पॉट विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. सेल्फ असेसमेंटद्वारे 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 34 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 34 नागरिकांपैकी चार निगेटिव्ह, 30 अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ प्रॉक्सीमिटीद्वारे 103 नागरिकांशी संपर्क केलेला असून  88 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 88 नागरिकांपैकी 8 पॉझिटिव्ह, 73 निगेटिव्ह तर प्रतीक्षेत 7 नमुने आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू फॉरकास्टइमर्जिंग हॉटस्पॉट अंतर्गत 52 गावांमध्ये 61 पर्यवेक्षक, 638 पथके, 33 हजार 288 घरे व 1 लाख  47 हजार 253 लोकसंख्येच्या माध्यमातून 22 हजार 45 कोमॉरबीडीटी  असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 131 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 77 स्वॅब घेण्यात आले आहे व उर्वरित नागरिकांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्ह्यात एकूण 30 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 21 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. तर, 9 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.
कोविड-19 संक्रमित 72 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-8, मुंबई-12, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -5, औरंगाबाद -2, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-5, संपर्कातील व्यक्ती - 16 आहेत.
जिल्ह्यात 3 हजार 403 स्वॅब नमुने तपासणीस पाठविलेले होते. यापैकी 72 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 403 नमुने निगेटिव्ह, 337 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर 30 नमुने अनिर्नयित आहेत. जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणा विषयक माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 835 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 305, तालुकास्तरावर 213, तर जिल्हास्तरावर 317 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 81 हजार 5 नागरिक दाखल झालेले आहेत. 76 हजार 774 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच 4 हजार 231 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित) आणि 25 जून (एकूण 10 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 72 झाले आहेत. आतापर्यत 48 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  72 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 24 आहे.
00000

No comments:

Post a Comment