Search This Blog

Friday 19 June 2020

नोंदणी झालेल्या विना रेशन कार्डधारकांनाही धान्य वाटप

नोंदणी झालेल्या विना रेशन कार्डधारकांनाही धान्य वाटप
धान्याची उचल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
चंद्रपुर,दि.19 जून: जिल्ह्यातील ज्यांचेकडे कोणत्याही योजनेचे रेशन कार्ड नाही अशा सर्व गरजुगरीबविस्थापित मजूर ज्यांची नावे संबंधीत तालुक्यांनी व नगरपालिकामहानगरपालिका यांनी निश्चित केलेली आहे. अशा सर्व लोकांचे धान्य (तांदुळ व अख्खा चना ) याचा समावेश असून हे सर्व धान्य सबंधित स्वस्त धान्य दुकानात पोहोचले असुन यादीतील लोकांनी या धान्याची स्वस्त धान्य दुकानातून तात्काळ उचल करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
हे धान्य पुर्णत: मोफत असुन माहे मे व जून 2020 या दोन महिन्यासाठीच आहे. त्याचे वाटपाचे परिमाण हे तांदुळ प्रति माणसी 5 किलो प्रति महिना व चना किलो प्रति कुटुंब प्रति महिना असे असून दोन्ही महिन्याचे धान्य हे एकाच वेळेस वाटप करण्याचे निर्देश सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेले आहे.
तसेच जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या कार्डधारकांना माहे जून महिन्यात नियमित धान्याबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 किलो तांदुळ प्रति माणसी व मेजून महिन्याची डाळ दोन किलो (तुरडाळ व चनाडाळ यापैकी उपलब्ध असलेली ) प्रति कुटुंब याप्रमाणे मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. तसेच केशरी कार्डधारकांना प्रति माणसी 3 किलो गहू रु. 8  प्रति किलो व 2 किलो तांदुळ प्रति किलो रु. 12 याप्रमाणे माहे जून करिता वाटप सुरु आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व योजनेच्या कार्डधारकांनी व रेशनकार्ड नसलेल्या गरीबगरजु, विस्थापित मजुर यांनी आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मोफत तांदुळ व अख्खा चना याची संबंधीत स्वस्त धान्य दुकानातुन उचल करावी. तसेच काही तक्रारी असल्यास 1800-22-4950 किंवा 1967 किंवा 1077 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संबंधित तहसिल कार्यालयात तक्रार दाखल करता येईल.
00000

No comments:

Post a Comment