Search This Blog

Friday 26 June 2020

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी घरोघरी जनजागृती सुरु

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी
घरोघरी जनजागृती सुरु
आत्मभान अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचा
नाविन्यपूर्ण उपक्रम
चंद्रपूर,दि. 26 जून: ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी आत्मभान अभियानांतर्गत जिल्हा परिषद नावीन्य पूर्ण उपक्रम राबवित आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग तसेच प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर यांच्या संयुक्त उपक्रमाने जिल्ह्यातील गावांमध्ये कोरोना विषयक जनजागृती करण्यात येत आहे.दिनांक 24 जून रोजी जिवती तालुक्यातील पाटागुडासितागुडाघाटराई गुडा व जनकापुर कोलाम या गावांमध्ये गृहभेटी देऊन कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनावैयक्तिक स्वच्छतादैनंदिन काम करीत असताना शारीरिक अंतर  याविषयीची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने प्रत्येक घरोघरी जाऊन जागृती विषयक पत्रकेस्वच्छते संदर्भात प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
याविषयी ग्रामपंचायतीची स्थानिक गाव आरोग्यपोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्यआरोग्य सेवा  समितीचे सदस्यग्राम दक्षता समितीचे सदस्यआरोग्य सेवांवर लोक आधारित समितीचे सदस्यमहिला बचत गटातील सदस्य तसेच प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूरचे जिल्हा समन्वयक निलेश देवतळेतालुका समन्वयक अक्षय मधुकर गोरले यांचे चमू काम बघत आहे.
नागरिकांना कोरोनाच संसर्ग पसरविण्यासाठीदक्षता घेणे नागरिकांमधील कोरोना विषयक असणारी भीती दूर करणे अर्थात कोरोना विषयक  संपूर्ण माहितीचे सर्वप्रथम संबंधित समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतल्यानंतर लोकसहभागाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत जिवती तालुक्यातील चार गावांमधील  90 घरी जाऊन कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये तसेच गाव कोरोना मुक्त कसे राहील यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जनजागृती संदर्भातील उपक्रम प्रत्येक तालुक्यामध्येगावांमध्ये राबविण्याचे नियोजन आहे.
00000

No comments:

Post a Comment