Search This Blog

Saturday 27 June 2020

आतापर्यंतची बाधित संख्या 81

चंद्रपूर जिल्ह्यात 81 हजारावर नागरिक दाखल
आतापर्यंतची बाधित संख्या 81
30 अॅक्टिव्ह ; 51 झाले बरे
Ø  शनिवारी आणखी 6 कोरोना पॉझिटीव्ह
Ø  शुक्रवारी भद्रावती शहरात आढळले होते दोन बाधित
Ø  4 हजारावर नागरिक गृह अलगीकरणात
Ø  855 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
Ø  सध्या 12 कंटेनमेंट झोन कार्यरत
चंद्रपूर,दि. 27 जून: जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज दिवसभरात 6 नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहे. तर अन्य एक नागरिक गडचांदूर येथील आहे.त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या 81 झाली आहे. तर समाधानाची बाब म्हणजे या बाधितांपैकी 51 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या चार नागरिकांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहे.
यामध्ये टिळकनगर ब्रह्मपुरी येथील 24 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नागपूर शहरातून 25 जून रोजी परतलेल्या या युवकाला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 26 तारखेला विलगीकरण कक्षात दाखल करून स्वॅब घेण्यात आले. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील अन्य 22 वर्षीय महिलेला नागपूर येथून 25 तारखेला परतल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 26 ला घेतलेला त्यांचा स्वॅब 27 ला पॉझिटिव्ह आला आहे.
तर पटेल नगर ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय आई व तिचा 34 वर्षीय मुलगा यांना अकोला येथून परत आल्यानंतर 26 तारखेला विलगीकरणा दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना आता चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.
गडचांदूर येथील 28 वर्षीय युवक हा औरंगाबाद येथून 24 जून रोजी परत आला होता लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.26 जून ला स्वॅब घेण्यात आला.आज तो बाधित असल्याचे पुढे आले आहे.
तर अन्य दोन बाधित हे आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीतून पुढे आले आहेत.यामध्ये गांगलवाडी येथील 55 वर्षीय पुरूष66 वर्षीय महिला असे हे दोन बाधित आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
तत्पुर्वी,शुक्रवारी भद्रावती शहरात दोन नागरिक कोरोना बाधित आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार भद्रावती शहरातील गणपती वार्ड येथील मुंबईवरून परत आलेला 22 वर्षीय युवक कोरोना बाधित झाला आहे. 22 जून रोजी मुंबईवरून आल्यानंतर या युवकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. काल स्वॅब नमुना घेतल्यानंतर शक्रवार 26 जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरे 53 वर्षीय व्यक्ती देखील भद्रावती शहरातील असून बस स्टँड परिसरात राहणारे हे व्यक्ती हरियाणा येथून 14 जून रोजी भद्रावती येथे आले होते. फरिदाबाद येथील रहिवासी असणाऱ्या विलगीकरणातील या नागरिकाचा स्वॅब नमुना घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
सध्या 12 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 34 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 22 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. तर, 12 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे. आजपर्यंत एकूण 30 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह तर एक नमुना अनिर्नयित आहे.
स्व मुल्यांकन (सेल्फ असेसमेंट)ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी)अंदाजज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहे, त्या ठिकाणची तपासणी (फोरकास्टइमर्जिंग हॉटस्पॉट) विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. स्व मुल्यांकनद्वारे (सेल्फ असेसमेंट) 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 34 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 34 नागरिकांपैकी चार निगेटिव्ह, 30 अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ निकटताद्वारे
(ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) 112 नागरिकांशी संपर्क केलेला असून  106 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 106 नागरिकांपैकी 9 पॉझिटिव्ह, 78 निगेटिव्ह तर प्रतीक्षेत 19 नमुने आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू अंदाज (फॉरकास्ट)इमर्जिंग हॉटस्पॉट अर्थात ज्या भागामध्ये कोरोना संशयित बाधित मिळू शकतात अशी शक्यता आहेत्या ठिकाणच्या तपासणी अंतर्गत 60 गावांमध्ये 74 पर्यवेक्षक, 720 पथके, 33 हजार 288 घरे व 1 लाख  57 हजार 671 लोकसंख्येच्या माध्यमातून 22 हजार 45 दुर्धर आजार  (कोमॉरबीडीटी)  असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 145 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 113 स्वॅब घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 24 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 81 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 570 नमुने निगेटिव्ह, 341 नमुने प्रतीक्षेत तर 32 अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 855 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 323 नागरिक,तालुकास्तरावर 230 नागरिक तरजिल्हास्तरावर 302 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 81 हजार 903 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 77 हजार 872 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 58 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित) आणि 27 जून (एकूण 7 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 81 झाले आहेत. आतापर्यत 51 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  81 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 30 आहे.
00000

No comments:

Post a Comment