Search This Blog

Saturday, 20 June 2020

आंतरराष्ट्रीय योग दिन घरीच साजरा करण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिन घरीच
साजरा करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.20 जून: क्रीडा व युवक सेवा संचालनालयपुणेजिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर व भारत स्वाभिमान पंतजली योग समिती चंद्रपूरच्या वतीने दि. 21 जून आंतराष्ट्रीय योग दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असतो. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिन घरीच साजरा करण्याचे आवाहनजिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले आहे.
संपूर्ण जगात कोवीड-19  चा प्रसार होऊ नये म्हणून दि.21 जून 2020 रोजी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 31 मे 2020 रोजी मन की बात या कार्यक्रमात संबोधीत केल्यानुसार योग हा समाजाकरीताआरोग्याकरीता व एकात्मिक करिता आवश्यक आहे. हा संदेश जनतेला दिला. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयम. रा. पूणे यांचे परिपत्रकानुसार युवकयुवती व नागरीकांनी दि. 21 जुन 2020 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या घरीच व्यवस्थीत अंतर ठेवून सकाळी 7 वाजता ते सकाळी 7.45 वाजता या कालावधीत योग प्राणायामयोगासने करुन साजरा करण्यात यावाअसे जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment