Search This Blog

Friday 26 June 2020

जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने अंगणवाडी केंद्राच्या समोर फुलतंय परसबाग

जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने
अंगणवाडी केंद्राच्या समोर फुलतंय परसबाग
चंद्रपूर,दि.26 जून: जिल्हा परिषद चंद्रपूरच्या पुढाकाराने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये परसबाग तयार करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिलेउपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय जोल्हे यांचे मार्गदर्शनात सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्य करीत आहे.
बालविकास प्रकल्प अधिकारी पोंभुर्णाचे अमोल मेरगळविस्तार अधिकारी सुरेश राठोड,तालुक्यातील सर्व सरपंच,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,मदतीनिस तसेच ग्रामीण विकास दूत सुमित तिवारी यांच्या समन्वयाने उमेद अभियानाच्या माध्यमातून 25 जून ते 15 जुलै दरम्यान पोषण पंधरवाडा अंतर्गत पोंभूर्णा तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये परसबाग लावण्यात येत आहे.
परसबागेचा प्रमुख उद्देश म्हणजे स्वच्छ आणि ताज्या भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन यातून सकस आहार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना देणे होय. यामध्ये 3 ते 6 वयोगटातील लाभार्थीस्तनदा मातागरोदर माता त्यांच्या आहारात पालेभाज्यांचा वापर करून कुपोषणाचे प्रमाण कमी करणे होय. या परसबागेमध्ये प्रामुख्याने चवळीपालक,कोथिंबीरमेथीटोमॅटो,वांगीमिरची इत्यादी अनेक पालेभाज्या व फळभाज्या घेतल्या जात आहे.
परसबागेसाठी गावातील सरपंच,बालविकास प्रकल्प अधिकारी,पर्यवेक्षिकाग्रामसेवक,अंगणवाडी सेविकामदतनीस तसेच उमेदच्या सर्व गावातील कृषी साथी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते.
00000

No comments:

Post a Comment