Search This Blog

Monday, 8 June 2020

ती टोळधाड नसून नाकतोड्याची पिल्ले : डॉ. नागदेवते

ती टोळधाड नसून नाकतोड्याची पिल्ले : डॉ. नागदेवते
चंद्रपूर, दि. 8 जून: विदर्भात पहिल्यांदा धडकलेल्या कथित टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी व शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी चिमूर तालुक्यातील मौजा आंमडी बेगड येथे शालिक विटाळी यांच्या शेतामध्ये  डॉ. तांबेडॉ. सवईडॉ. बोरकर या शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. नागदेवतेडॉ.देशपांडे उपस्थित होते.तथापी,ही टोळधाड नसून नाकतोड्यांचा हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये टोळधाडीचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा  दिला आहे. कृषी विभागामार्फत या किडीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या आहेत.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या भेटीमध्ये शेतात आढळून आलेली पिल्ले ही टोळधाडीची नसून ती नाकतोड्याची आहेत. त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. एकही टोळधाडीचे प्रौढ कीड पिकांवर आढळून आले नाही. त्यामुळे शेतातील कोणत्याही प्रकारच्या झाडांना व वनस्पतींना त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही. तसेच या नाकतोड्याचे प्रमाण खूप कमी असल्याने यापासून शेतातील पिकाला काहीही धोका नाही. असे शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment