Search This Blog

Sunday 21 June 2020

ब्रह्मपुरी तालुक्यातील कोरोना स्वॅब चाचणी संख्येत वाढ करण्यात यावी : ना. वडेट्टीवार

ब्रह्मपुरी तालुक्यातील कोरोना स्वॅब चाचणी संख्येत वाढ करण्यात यावी : ना. वडेट्टीवार
कोविड केअर सेंटरच्या कामकाजाची माहिती घेतली जाणून
तालुक्यातील रस्ते बांधकामपाणीपुरवठाकायदा सुव्यवस्थेचा आढावा
चंद्रपूर, (ब्रम्हपुरी) दि. 21 जून: ब्रह्मपुरी तालुक्यामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या नागपूरला जवळ असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता तालुक्यातील कोरोना स्वॅब चाचण्या वाढविण्यात याव्यातअशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची याठिकाणी बैठक घेऊन कोरोना आजारा संदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबेनगराध्यक्ष रीता उराडेमुख्याधिकारी मंगेश वासेकरग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष खिल्लारेतहसीलदार विजय पवारजिल्हा परिषदेचे उपअभियंता नन्नावरेतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दूधपचारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना जिल्ह्यात मोठी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून गरजेनुसार व तातडी बघून नागपूर आणि चंद्रपूर येथील प्रयोगशाळेचा वापर करण्याचे सूचित केले. चंद्रपूरमध्ये पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून अडीच कोटी रुपयांची स्वॅब तपासणीची कोरोना प्रयोगशाळा उभी झाली असून या प्रयोगशाळेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचा अहवाल तातडीने प्राप्त होत आहेत. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तपासणी गतीने होत आहे. या प्रयोगशाळेचा वापर करण्याचे देखील यावेळी त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
यावेळी खनिज निधीमधून तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या रस्ते बांधकामाचा देखील त्यांनी आढावा घेतला. मंजूर झालेल्या रस्त्यांना तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बांधकाम विभागाला केले. पावसाळ्याच्या पूर्व काळात रस्ते बांधकाम गतीने पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा संदर्भातही आढावा घेतला. तालुक्यातील बंद पडलेल्या योजनातांत्रिक अडचणीमुळे मागे पडलेल्या योजना व ग्रामीण भागात वीज जोडणीमुळे मागे पडलेल्या योजनांची विभागणी करून प्राथमिकतेने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पावसाळ्यामध्ये साथ रोगाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रउपकेंद्र या ठिकाणी आवश्यक औषध पुरवठा व सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश द्यावेअसे स्पष्ट केले. यावेळी महसूल यंत्रणेने देखील आगामी काळामध्ये आवश्यक सर्व कर्मचारी मुख्यालयी राहतील याकडे लक्ष वेधण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये आतापर्यंत 12 बाधितांची नोंद आहे. मात्र सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून येणाऱ्या नव्या नागरिकांची गाव पातळीवर देखील योग्य नोंद घेतली जावीअसे निर्देश दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष खिल्लारे यांनी ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटर मध्ये आतापर्यंत घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल दिला. 70 ते 80 टक्के ग्रामीण रुग्ण याठिकाणी येत असून तातडीने स्वॅब तपासणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
00000

No comments:

Post a Comment