Search This Blog

Tuesday 23 June 2020

पालकमंत्री आज साधतील कोरोना विषयावर 11.30 वाजता नागरिकांशी संवाद

पालकमंत्री 24 जून रोजी साधतील कोरोना विषयावर
11.30 वाजता नागरिकांशी संवाद
यावेळी फोन इन कार्यक्रमात ना.वडेट्टीवार
चंद्रपूर,दि.23 जून: जिल्हा प्रशासना अंतर्गत कोरोनाच्या  काळात जनजागृती विषयीची माहिती घरोघरी व साध्यासोप्या भाषेमध्ये नागरिकांना माहिती व्हावी यासाठी आत्मभान अभियान सुरू केलेले आहे. या आत्मभान अभियानातील महत्त्वपूर्ण फोन इन कार्यक्रमात राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर नागरिकांशी दिनांक 24 जून रोजी दूरध्वनीद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोना नियंत्रण व जिल्हा प्रशासन याबद्दलचेच प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण व्हावे यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. जिल्ह्यामधील अलगीकरणाची व्यवस्था, बाहेर अडकलेल्या मजुरांना सुखरूप स्वगावी पोहोचविणेउद्रेकाच्या काळातील अतिरिक्त बेडची व्यवस्थाकोरोनाच्या काळामध्ये शेतकरीव्यावसायिक त्यांच्यासाठी घेण्यात आलेले निर्णय याबद्दल प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबत नागरिकांच्या मनात शेकडो प्रश्न आहेत.अशा निवडक प्रश्नावर थेट आकाशवाणी स्टुडीओतून ते जनतेशी संवाद साधणार आहे.
आत्मभान अभिनातंर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने या फोन-इन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून दिनांक 24 जून बुधवार रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी फक्त कोरोना आणि प्रशासनाची तयारी या संदर्भातीलच प्रश्न सकाळी  11:30 ते 12 या वेळेत 07172-254634 या संपर्क क्रमांकावर  विचारू शकता. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 27 जून शनिवारी रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी फोन-इन या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय व प्रशासनाने केले आहे.
00000

No comments:

Post a Comment