Search This Blog

Thursday 18 June 2020

ऑनलाइन रोजगार मेळावा महास्वयम वेबपोर्टल वर नोंदणी बाबत

ऑनलाइन रोजगार मेळावा
महास्वयम वेबपोर्टल वर नोंदणी बाबत
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभा
चंद्रपूर,दि. 18 जून: कोविड-19 मुळे राज्यात निर्माण झालेल्या रोजगाराच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक पातळीवरील जिल्ह्यातील उद्योजकांकडे रोजगार प्राप्त करुन देण्याकरीताऑनलाईन रोजगार मेळाव्याचे माध्यमातून रोजगार मिळवून देणेकरीता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे. या विभागाचे महास्वयम वेबपोर्टलवर मागणी नोंदविणेबाबत  दिनांक 15 जून रोजी वीस कलमी सभागृहजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
कोविड-19 मुळे जे स्थलांतरीत कामगार जिल्ह्यात परत आलेले आहेतअशा सर्व उमेदवारांची यादी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त करुन महास्वयम वेबपोर्टलवर नोंदणी करावी. तसेच महास्वयम वेबपोर्टलवर जास्तीत जास्त उद्योजकांनी तसेच उमेदवारांनी नोंदणी करावीअसे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी यावेळी केले.
सभेच्या सुरुवातीला  सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी सर्व उद्योजक तथा अधिकारी यांना परिचय देण्यास सांगून प्रास्ताविक केले. त्यानंतर संबधित विषयाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महास्वयम वेबपोर्टलवर ऑनलाईन व्हर्च्युअल जॉब फेअर करीता संबधित उद्योजकांकडे असलेल्या रिक्तपदांची माहिती युजर आयडी व पासवर्ड http:// www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर लॉगीन करुन आवश्यक माहिती पूर्णपणे भरावी.  पाहिजे असलेल्या शैक्षणिक पात्रतेचे कुशल,अकुशल उमेदवारांची यादी स्वतः डाऊनलोड करुन उमेदवारांना एसएमएस,व्हॉट्सअप,मोबाईल इ. माध्यमातून संपर्क साधूनत्यांची मुलाखत घेतल्या जाईल. पात्र उमेदवारांची निवड करुन आपल्या आस्थापनेवर,कंपनीमध्ये नियुक्त करु शकतात याबाबतची माहिती देण्यात आली.
उद्योजकांनी  कामगारांविषयी माहिती दिली असता. त्यांचेकडे कोणीही कामगार काम सोडून गेलेले नाही असे सांगितले.
00000

No comments:

Post a Comment