Search This Blog

Monday 15 June 2020

शेती संबंधित दुकाने सोमवार ते रविवार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू



चंद्रपूरदि.15 जून: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात  शिथीलता देण्यात आली आहे. शेती संबंधित दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.
खतेकीटकनाशकेबी-बियाणे यांचेशी निगडित उत्पादनपॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योगआस्थापनादुकाने संपूर्ण जिल्हाकरिता सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.  रविवारला सदर दुकाने पूर्णतः बंद राहतील असे आदेशित केलेले आहे. त्यामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
आता खते,कीटकनाशके व बी-बियाणे यांच्याशी निगडित उत्पादनपॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योगआस्थापना,दुकाने संपूर्ण जिल्ह्याकरिता सोमवार ते रविवार या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.
सदरचा आदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिनांक 15 जून ते  30 जून या कालावधीकरीता लागु राहील. तसेच प्रतिबंधित क्षेत्राकरिता (कंटेनमेंट झोन) लागू राहणार नाही.
00000

No comments:

Post a Comment