Search This Blog

Monday 29 June 2020

वीज बिल समजून घ्या वेबिणार संवादातून

वीज बिल समजून घ्या वेबिणार संवादातून
वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
चंद्रपूरदि.29 जून: लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य ग्राहकांना वीज बिलाविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व सदर ग्राहकांच्या वीज बिलाविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणचंद्रपूर विभागाद्वारे चंद्रपूरमुल व सावली तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी आपले वीज बिल समजून घ्या या विषयावर ऑनलाईन वेबिणारचे मंगळवार दिनांक 30 जून रोजी दुपारी 12.30 ते दुपारी 2 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांनी जास्तीत जास्त (घरगुती व वाणिज्य) सहभाग नोंदवून वीज बिलाविषयी असलेल्या शंकाचे निरसन करून घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
             घरगुती व वाणिज्य ग्राहकांसाठी होणाऱ्या वेबिणारमध्ये महावितरणने वितरीत केलेले माहे एप्रिलमे व जून महिन्याचे वीज बिलाविषयी असलेला संभ्रम व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. वेबिणारमध्ये सहभागी होण्याकरिता महावितरणच्या https://meet.google.com/uik-rjyw-cdn या लिंकवर जाऊन घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना सहभागी होता येईल.
            ग्राहकांच्या वीज बिलाविषयी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले वीज बिल समजून घ्या. या वेबिणारमध्ये चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंतासर्व उपविभागीय अभियंते व बिलिंग विभागाशी संबंधीत अधिकारी हि सहभागी होणार आहेत. याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर हि ग्राहक स्वत: आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात.
00000

1 comment:

  1. Sir itana jada bill aya he ki jay kre 2550 aya he bill dhoda kam krva do plz

    ReplyDelete