Search This Blog

Wednesday 17 June 2020

अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 28

अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 28 ;
चंद्रपूरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 54 वर
Ø  आतापर्यंत 26 बाधित कोरोना मुक्त
Ø  73 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण
Ø  14 कंटेनमेंट झोन बंद तर 10 कंटेनमेंट झोन कार्यरत
Ø  आरोग्य सेतू ॲप्सचा वापर करून बाधितांची शोध मोहीम
चंद्रपूर,दि. 17 जून: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील एका बावीस वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज बुधवार दिनांक 17 जून रोजी आलेल्या या एका पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील बाधितांची आतापर्यंतची संख्या 54 झाली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ॲक्टिव्ह बाधितांची संख्या 28 आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहिती नुसार हा 22 वर्षीय युवक  मुंबई येथून 12 जून रोजी गांगलवाडी येथील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये होता. लक्षणे दिसून आल्यानंतर 15 तारखेला ब्रह्मपुरी कोवीड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. 16 जुन रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. 17 जून रोजी युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून या पॉझिटिव्ह बाधितासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह बाधितांची संख्या 54 झाली आहे.   
तत्पूर्वी काल 16 जून रोजी पॉझिटिव्ह बाधिताची संख्या एकूण 5 झाली होती. यामध्ये नवी दिल्ली नजीकच्या गुडगाव या शहरातून  चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या 32 वर्षीय व्यक्तीराजुरा येथील साई नगर भागातील 27 वर्षीय युवकबल्लारपूर शहरातील टिळक नगर भागातील आई आणि मुलगी,  ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या 19 वर्षीय युवकाचा समावेश होता.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 54 झाली आहे.आतापर्यंत 26 बाधितांना कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या अॅक्टिव्ह बाधितांची संख्या 28 आहे. यापैकी 26 बाधित कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर तर 2 बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे.या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.
14 कंटेनमेंट झोन बंद तर 10 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 24 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 14 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.
कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण:
आजपर्यंत एकूण 24 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 56 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 54 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह व एक नमुना प्रतीक्षेत आहेत.
कोविड-19 संक्रमित 54 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -4, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-1,मुंबई-8, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3,जळगांव-1, यवतमाळ -4, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.
आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधितांची शोध मोहीम:
दिनांक 11 जून पासून आरोग्य सेतू ॲप वरील मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) गंभीर आजार असलेलेकोविडचे संभाव्य लक्षणे असणाऱ्या (अनवेल कोमॉरबीडीटी) व्यक्तींचा डाटा प्राप्त करून मुख्य वैद्यकीय अधिकारी (महानगरपालिका चंद्रपूर)संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना यादी पाठविण्यात येते.सदरील व्यक्तींची आरोग्य तपासणी करून जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित करून व स्वॅब घेवून शोध मोहीम सुरू केलेली आहे.
कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती:
जिल्ह्यामध्ये 2 हजार 526 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 54 नमुने पॉझिटिव्ह, 2 हजार 197 नमुने निगेटिव्ह, 257 नमुने प्रतीक्षेत तर 18 अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 135 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 418 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तालुकास्तरावर 419 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तरजिल्हास्तरावर 298 नागरिक  संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात 78 हजार 574 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 73 हजार 991 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 583 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधितांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून ( एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),
15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण बाधित), 17 जून ( एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 54 झाले आहेत. आतापर्यत 26 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  54 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 28 आहे.
00000

No comments:

Post a Comment