Search This Blog

Friday, 12 June 2020

वन्य प्राणी बिबटची शिकार

वन्य प्राणी बिबटची शिकार
चंद्रपूर वनविभागा अंतर्गत सिर्सी नियतक्षेत्रातील घटना
चंद्रपूर,दि. 12जुन: चंद्रपूर वनविभागाअंतर्गत सावली परिक्षेत्रातील सिर्सी बिटाच्या कक्ष क्रमांक 1534 मधील वनक्षेत्रात वन्य प्राणी बिबट्या शिकार झाल्याची घटना घडली. अज्ञात इसमाकडून रानडुक्कराची शिकार करण्याकरीता लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये वन्यप्राणी बिबट अडकला.
क्षेत्रिय कर्मचारी गस्तीवर असतांना हा प्रकार निदर्शनास आला त्यावेळी बिबट जिवंत होता. रेस्क्यु ऑपरेशन करीता तातडीने टिम बोलविण्यात आलेली होती. परंतू,रेक्स्यु टिम घटनास्थळी पोहचण्या अगोदर बिबटचा मृत्यू झालेला होता. मोकास्थळी शवविच्छेदनाची कार्यवाही पशुवैद्यकीय अधिकारी टि.टि.सी चंद्रपूर डॉ.कुदंन पोडचेलवारपशुवैद्यकीय अधिकारी मुल डॉ. रोहीनी अरबळ यांनी विभागीय वन अधिकारी सोनकुसरे,वन्य प्राणी संरक्षण संस्था सदस्य मुकेश भांदककर,उमेशसिंह झिरे  व पोलीस पाटील उपरी श्रीकृष्ण मुरसे,  वनपरिक्षेत्र अधिकारीसावली जी.व्ही.धाडे तसेच वनकर्मचारी यांचे समक्ष पुर्ण करून त्याच ठिकाणी दहन करण्यात आले.
सदर प्रकरणाचा तपास सुरू असून आजपर्यंत 19 संशयीत इसमास चौकशी करीता ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील तपास सुरू आहे.
00000

No comments:

Post a Comment