Search This Blog

Monday 29 June 2020

चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यतची बाधित संख्या 95

चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यतची बाधित संख्या 95
उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 42;
53 बाधित कोरोना मुक्त
Ø  ब्रम्हपुरी तालुक्यात एकाच दिवशी 8 बाधितांची नोंद
Ø  रविवारी वरोरा शहरात 5 तर भद्रावतीत एक बाधित
Ø  जिल्ह्यात 83 हजारावर नागरिक दाखल
Ø  संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक
चंद्रपूर,दि.29 जून: जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये सोमवार दिनांक 29 जून रोजी 8 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या 8 बाधितांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्याची संख्या 95 झाली आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या 42 आहे. आतापर्यंत उपचार होऊन कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 53 आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ब्रह्मपुरी शहरातील पटेल नगर परिसरातील यापूर्वीच्या कोरोना बाधित असणाऱ्या कुटुंबातील 30 वर्षीय महिला व 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी शहरातील गुजरी वार्ड येथील यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील 50 वर्षीय महिला देखील आज कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे.
 ब्रह्मपुरी शहरातील नागपूर येथून परत आलेल्या 25 वर्षीय संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या महिलेचा 26 जून रोजी घेण्यात आलेला नमुना पॉझिटिव्ह ठरला आहे.
 तर गांगलवाडी येथील संपर्कातून तयार झालेल्या चार पॉझिटिव्हची आज नोंद करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या बाधिताच्या 30 वर्षीय मुलाचा समावेश आहे.
 गांगलवाडी येथीलच आरोग्य सेतू अॅप मार्फत मिळालेल्या माहितीनुसार  एका 70 वर्षीय वरिष्ठ नागरिकाचे स्वॅब घेण्यात आले. 28 जूनला घेतलेला हा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.
 गांगलवाडीमध्ये संपर्कातील अहवाल मोठ्या प्रमाणात तपासले जात आहे. त्यामुळे यापूर्वी पॉझिटीव्ह ठरलेल्या बाधितांच्या 55 वर्षीय भावाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 संपर्कातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे या उदाहरणावरून पुढे आले आहे. गांगलवाडी येथील एका तीन वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. ही मुलगी आपल्या आजोबाच्या संपर्कात आली होती.
तत्पुर्वीरविवारी जिल्ह्यातील वरोरा येथील एकाच कुटुंबातील चार नागरिक बाधित आढळून आले. आहे तर अन्य एक नागरिक देखील वरोरा येथील आहे. याशिवाय भद्रावती येथील एक नागरिक पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
       आरोग्य विभागाकडून रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार वरोरा येथील कासमपंजा वार्ड मधील हैदराबाद वरून आलेल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये समावेश आहे. बाधित रुग्णाच्या 54 वर्षीय सासू, 25 वर्षीय साळाबारा वर्षीय मुलगा व नऊ वर्षीय मुलीचा यामध्ये समावेश आहे. 27 जून रोजी स्वॅब घेण्यात आले होते. 28 ला त्यांचा सर्वाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या कुटुंबाशिवाय वरोरा येथील मालवीय वार्ड येथील 35 वर्षीय पुरुष देखील पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे. 25 तारखेला आपल्या पत्नीसह मुंबई येथून परत आलेल्या या व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पत्नीला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते.पत्नीची स्वॅब चाचणी निगेटिव्ह आली मात्र पतीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
वरोरा येथील या  पाच रुग्णांसोबतच भद्रावती शहरातील बागडे वार्डसावरकर नगर येथील 47 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी हरियाणा येथून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील काही व्यक्तींच्या चाचणीत या 47 वर्षीय पुरुषाचा अहवाल बाधित म्हणून पुढे आला आहे. 27 जून रोजी संपर्कातील नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले होते.
सर्व 6 पॉझिटिव्ह व्यक्ती अलगीकरणातील असल्यामुळे कुठेही शहरात अतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्र निर्माण करण्यात आलेले नाही. या सहाही बाधितामध्ये कोणतेही लक्षणे नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-7, बल्लारपूर दोनपोंभूर्णा दोनसिंदेवाही दोनमुल तीनब्रह्मपुरी 16, नागभीड चारवरोरा पाच बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चारवरोरा 9, राजुरा दोनमुल एकभद्रावती चारब्रह्मपुरी-11, कोरपणानागभिडगडचांदूर प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ तीनबालाजी वार्ड दोनभिवापूर वार्ड एक शास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4, जोडदेउळ एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 95 वर गेली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19ची सर्वसाधारण माहिती:
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 4 हजार 381 स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 95 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 934 नमुने निगेटिव्ह, 320 नमुने प्रतीक्षेत तर 32 अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यातील अलगीकरणा विषयक माहिती:
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 283 नागरिक,तालुकास्तरावर 231 नागरिक तरजिल्हास्तरावर 361 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 83 हजार 259 नागरिक दाखल झाले आहेत. 80 हजार 56 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 3 हजार 203 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित) आणि 29 जून (एकूण 8 बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 95 झाले आहेत. आतापर्यत 53 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  95 पैकी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या  बाधितांची संख्या आता 42 आहे.
00000

No comments:

Post a Comment