Search This Blog

Saturday 27 June 2020

आरोग्य सेतू अॅप असणाऱ्या अभ्यांगतांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश

आरोग्य सेतू अॅप असणाऱ्या अभ्यांगतांनाच
शासकीय कार्यालयात प्रवेश
जिल्हा प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
चंद्रपूर,दि.27 जून: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शासकीय कार्यालयात होऊ नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्वच शासकिय कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांना तसेच प्रशासनातील विभाग प्रमुखअधिकारी कर्मचारी यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असणार आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या गावातील क्षेत्रातील अडचणीचे निराकरण करण्यास्तव  कार्यालयात भेट देण्यासाठी येतात. शासकीय कार्यालयात अभ्यांगतांचे येणे-जाणे नेहमीच सुरू असते. त्यामुळे कोणता व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला याचा शोध घेणे कठीण असते. कोविड-19 मुळे खबरदारी म्हणून अभ्यांगतांनी सदर ॲप डाऊनलोड करणे अतिशय आवश्यक आहे.
ज्या नागरिकांकडे स्मार्टफोन नाही त्यांनी 1921 क्रमांकाचा वापर करून डेटा असेसमेंट करावा. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यांगतांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲपमध्ये असेसमेंट अर्थात मुल्यांकन करण्यासाठी  मोबाईलचे ब्लूटूथ आणि लोकेशन सुरू ठेवावे. आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याची अपेक्षा प्रशासन संपर्काची नोंद असावी यासाठी ठेवत आहे.यामुळे स्वेच्छेने नागरिकांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करावे. हे बंधनकारक नसले तरी आरोग्यासाठी आग्रहाची अपेक्षा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000

No comments:

Post a Comment