Search This Blog

Tuesday 16 June 2020

चंद्रपूर जिल्हात आणखी चार पॉझिटीव्ह

चंद्रपूर जिल्हात आणखी चार पॉझिटीव्ह
ॲक्टिव बाधीतांची संख्या 27
Ø  बाधीताची संख्या पोहचली 52 वर
Ø  आतापर्यंत 25 बाधीत कोरोना मुक्त
Ø  78 हजारांवर नागरिक जिल्ह्यात दाखल
Ø  एक हजारावर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात
Ø  आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा
चंद्रपूरदि. 16 जून: जिल्ह्यातील राजुरा व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी आणखी तीन नागरिक कोरोना बाधित आढळले आहे. आज सकाळी ब्रह्मपुरी तालुक्यामधील मालडोंगरी गावातील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सायंकाळी राजुरा शहर एक व बल्लारपूर शहर दोन असे एकूण चार पॉझिटीव्ह मंगळवारी आढळल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 52 झाली आहे.
आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये राजुरा येथील साई नगर भागातील 27 वर्षीय युवक कोरोना बाधीत ठरला आहे. हा युवक अहमदाबाद वरून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता.तर बल्लारपूर शहरातील टिळक नगर भागातील वडील आणि मुलगी सुरत शहरातून आल्यानंतर गृह अलगीकरणात होते. काल घेण्यात आलेले या तिघांचेही स्वॅब आज पॉझिटीव्ह ठरले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील मुंबईवरून आलेल्या 19 वर्षीय युवकाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याला लक्षणे दिसल्यानंतर ब्रह्मपुरी कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. 15 जूनला त्याचा स्वॅब घेण्यात आला. हा युवक कोरोना बाधीत असल्याचे आज सकाळी पुढे आले आहे. त्यामुळे आजच्या एकूण 4 बाधीतांमुळे चंद्रपूर जिल्हयातील बाधीत रुग्णाची संख्या 52 झाली आहे. सर्व चारही बाधीताची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत 25 बाधीतांना कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या अॅक्टिव्ह बाधीतांची संख्या 27 आहे. या सर्व बाधीतांची प्रकृती स्थिर आहे.
13 कंटेनमेंट झोन बंद तर 10 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 23 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 13 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 10 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.आजपर्यंत एकूण 23 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 55 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी  सर्वच 55 नमुने निगेटिव्ह आले आहेत.
कोविड-19 संक्रमित 52 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधीतांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -3, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1,गुजरात-1, हैद्राबाद-1,मुंबई-7, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3,जळगांव-1, यवतमाळ -4, अहमदाबाद-1,सुरत-2, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.
कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती:
जिल्ह्यामध्ये 2 हजार 407 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 52 नमुने पॉझिटिव्ह, 2 हजार 167 नमुने निगेटिव्ह, 172 नमुने प्रतीक्षेत तर 16 अनिर्नयीत  आहेत. जिल्ह्यातील एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 139 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 421 नागरिकतालुकास्तरावर 412 नागरिक तरजिल्हास्तरावर 306 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 78 हजार 334 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 73 हजार 822 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 512 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
कोरोनाशी संबंधित माहितीआजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषयीची जोखीम कितपत आहे. यासाठी आरोग्य सेतू ॲप नागरिकांनी डाऊनलोड करावे. तसेच टोल फ्री क्रमांक 1921 किंवा 1075 यावर सुद्धा आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे.नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत), 23 मे (एकूण बाधीत), 24 मे (एकूण बाधीत 2), 25 मे (एक बाधीत ), 31 मे (एक बाधीत), जून ( एक बाधीत),4 जून (दोन बाधीत), 5 जून (एक बाधीत), 6 जून ( एक बाधीत ), 7 जून (एकूण 11 बाधीत), 9 जून (एकूण 3 बाधीत), 10जून ( एक बाधीत), 13 जून (एक बाधीत), 14 जून (एकूण बाधीत ), 15 जून (एक बाधीत) आणि 16 जून (एकूण 4 बाधीत) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 52 झाले आहेत. आतापर्यत 25 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 52 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 27 झाली आहे.

00000

No comments:

Post a Comment