Search This Blog

Tuesday 23 June 2020

जिम व व्यायाम शाळा आस्थापनांना घर, संकुल मालकांनी भाडे वसुली करीता तगादा लावू नये

जिम व व्यायाम शाळा आस्थापनांना
घरसंकुल मालकांनी भाडे वसुली करीता तगादा लावू नये
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर,दि.23 जून: जिल्ह्यात ज्या नागरिकांच्या घरी अथवा संकुलात जिम,व्यायाम शाळा इत्यादी आस्थापना संचालकास सदर आस्थापना चालविण्याकरिता खोली,इमारतसदनिकादुकान इत्यादींचे मासिक भाड्याने दिलेले असेल तर सदर आस्थापना संचालकांकडून मासिक भाडे वसूली करीता सारखा तगादा लावू नये,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील जिमव्यायाम शाळा इत्यादी आस्थापना दिनांक 24 मार्च 2020 पासून आजपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर आस्थापना संचालक यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे विविध निवेदन जिल्हा प्रशासनाकडे येत आहे. त्यामुळे मासिक भाडे वसुली करता तगादा लावू नये. तसेच भविष्यात लॉकडाऊन संपुष्टात येऊन जिमव्यायाम शाळा आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली तरी सुद्धा सदर आस्थापना संचालकाची आर्थिक परिस्थितीत सुरळीत होईपर्यंत त्यांचेकडून मासिक भाडे वसुली करता सारखा तगादा लावू नये,असे आवाहन एका परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

No comments:

Post a Comment