Search This Blog

Saturday 27 June 2020

1 ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

1 ते 7 जुलै कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 27 जून: हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी तसेच कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यास अनुसरून शेतकऱ्यांमध्ये परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी दि.1 जुलै ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषी विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गाव बैठकाशिवार भेटीव शेतीशाळेचे आयोजन करून कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहामध्ये खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारीजिल्हा परिषद कृषी विभागकृषी विद्यापीठेकृषी विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञआत्माकृषी मित्र हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच सर्व कृषी व कृषी संलग्न विभाग जसे पशुसंवर्धनदुग्धविकासमत्स्यव्यवसायरेशीम उद्योगमहिला आर्थिक विकास महामंडळखादी ग्रामोद्योगसहकारग्रामविकास,पणन इत्यादी विभागाच्या सहकार्याने त्या-त्या विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
कृषी संजीवनी सप्ताह दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून योजनांची माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000

No comments:

Post a Comment