Search This Blog

Monday 22 June 2020

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर दौरा

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचा
 चंद्रपूर दौरा
चंद्रपूरदि.22 जून: राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 23 व 24 जून रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या  दौऱ्यावर असणार आहेत.
मंगळवारी 23 जून रोजी गडचिरोली वरून त्यांचे सकाळी तहसील कार्यालय सावली येथे साडेदहा वाजता आगमन होणार आहे. सावली येथील अधिकाऱ्यांसोबत कोरोना उपाययोजना आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर सावली येथील विश्रामगृहावर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व अभ्यागतांसोबत भेटी व चर्चेचा कार्यक्रम ठेवला आहे. दुपारी अडीच वाजता ते सावली येथून चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे कोरोना संदर्भातील विकासकामांचा आढावा नियोजन भवन चंद्रपूर येथे घेणार आहेत. यामध्ये जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्यावर  पाणी अडविण्यासाठी आवश्यक दुरुस्ती आणि उपाय योजना करणे तसेच लोखंडी गेट ऐवजी प्लास्टिक फायबर प्लास्टिक फायबरचे गेट लावणेजिल्ह्यातील विविध पूल ब्रिज कम बंधारा या धर्तीवर तयार करून निधी आणि गावांमध्ये पाणीसाठा निर्माण करणे या संदर्भात आतापर्यंत केलेली कार्यवाही, निधीची आवश्यकता इत्यादी बाबींवर सभा आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी 4 वाजता जिल्ह्यातील एकूण सिंचनाची उपलब्धता व गोसीखुर्द सिंचन क्षेत्राखाली येणाऱ्या लाभ क्षेत्रामध्ये रबी पिकाचे तसेच उन्हाळी पिकाचे क्षेत्र वाढविण्याबाबत उपाययोजना करणेखरीब 2020 चे नियोजन विशेषत: खते व बियानांची उपलब्धता,पीक कर्जाचा व पीक विमाचा आढावा घेणार आहेत. दुपारी 4:30 वाजता कोविड-19 संदर्भात जिल्ह्यातील परिस्थिती आणि उपाय योजनांचा आढावा घेणार आहेत.सायंकाळी 5.30 वाजता नियोजन भवन चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री हिराई विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असून बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30 वाजता नियोजन भवनमध्ये आदिवासी विकास विभागमार्केटिंग फेडरेशनअन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. सकाळी 11 ते एक वाजेपर्यंतचा वेळ राखून ठेवण्यात आलेला आहे. दुपारी साडेतीन वाजता चंद्रपूर येथून माजरी तालुका भद्रावती कडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:15 वाजता माजरी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांचे वरोरा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतील. सायंकाळी 6 वाजता वरोरा येथून नागपूरकडे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता कमलाई निवास रामदास पेठ नागपूर येथे आगमन व मुक्काम असणार आहे.

00000

No comments:

Post a Comment