Search This Blog

Saturday 13 June 2020

चांदा ते बांदा प्रशिक्षणाचा प्रभाव शेतकरी वळले बीज प्रक्रियेकडे

चांदा ते बांदा प्रशिक्षणाचा प्रभाव
शेतकरी वळले बीज प्रक्रियेकडे
चंद्रपूर,दि. 13 जून: चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी 42 दिवसांचे प्रशिक्षणघेतले होते.या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान व प्रात्यक्षिकामधून आलेला आत्मविश्वास यांच्या बळावर पोंभुर्णा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी गुणवंत मोरेमुन्ना लोणारे या दोन युवा शेतकऱ्यांनी स्वतः इतर गावातील 12 शेतकरी प्रक्रियेकडे वळले आहे.त्याकरिता जिवाणू खते विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथून खरेदी केले आहे.
चांदा ते बांदा अंतर्गत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या प्रभावाने चंद्रपूर जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात शेतकरी बीज प्रक्रिया करणार आहेत. नेरी तालुका चिमूरचे अमिती व गणेश ढोले यांनी 60 किलो जिवाणू खत व ट्रायकोडर्माच्या माध्यमातून बीज प्रक्रिया करणार आहे.
या जिवाणू खतांची मात्रा 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करण्याची आहे. ट्रायकोडर्मा चार ग्रॅम एक किलो या प्रमाणात बियाणे पेरणीच्या वेळी त्यांना चोळायचे. या बीजप्रक्रियेमुळे वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर केला जातो.त्यामुळे  युरियासारख्या रासायनिक खतावरील खर्च कमी होतो.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य स्फुरद विरघळवितात व पिकांना उपलब्ध करून देतात. ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी इतर बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते. याविषयीचे फायदेकारक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणप्रात्यक्षिक चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आले. यामध्ये मूलपोंभुर्णासावली व सिंदेवाही तालुक्यातील 50 युवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
बियाणे पेरणीचे वेळी थोडे पाणी घेऊन त्यात पावडर मिसळून स्तरी करणे. सर्व बियांना चिटकेल असे चोळायचे असते. यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते. जमीन सुपीक होते. रोगांचे प्रमाण कमी होते.शेतीवरील खर्च कमी होतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावेअसे आवाहन कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनी केली आहे.
00000

No comments:

Post a Comment