Search This Blog

Friday, 12 June 2020

आत्मभान अभियानातील फोन इन कार्यक्रमाचे आज 10.30 ला प्रसारण

 आत्मभान अभियानातील फोन इन
कार्यक्रमाचे आज 10.30 ला प्रसारण
ऐका सिईओ राहुल कर्डिले यांच्या
सोबतचा कोरोना विषयीचा संवाद
चंद्रपुर,दि. 12 जून: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या अभियानांतर्गत 10 जून रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी कोरोना आणि जनसंपर्क या विषयावर संवाद साधला होता. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 13 शनिवारला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जनजागृती संदर्भात नवनवीन उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवीपरराज्यातून,परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी परवानगी कशी घ्यावीकुठे संपर्क साधावा एकंदरीत या काळात दैनंदिन काम करायचे असल्यास काय करावेअसे अनेक प्रश्नांचं निरसन फोन-इन कार्यक्रम अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी  केले आहे.
फोन इन कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून प्रसारित होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना आणि जनसंपर्क या विषयावर नागरिकांशी साधलेला संवाद ऐकावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment