Search This Blog

Tuesday 23 June 2020

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत 2 लाख 78 हजार रुपयांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत
2 लाख 78 हजार रुपयांची दारू जप्त
चंद्रपूर,दि.23 जून: जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना अवैधरित्या दारू आणणाऱ्या राकेश राजेश दुर्गे या आरोपीला अटक करून चेव्हरोलेट कंपनीची कथ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 31 सी आर 8897 या चारचाकी वाहनासह 2 लाख 78 हजार रुपयांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत जप्त केली आहे.
दिनांक 23 जून 2020 रोजी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान एक चेव्हरोलेट कंपनीची कथ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच 31 सी आर 8897 या चारचाकी वाहनातुन अवैधरीत्या दारुसाठा घुग्गुस येथे येणार आहे.अशी खात्रीशीर खबरेनुसार दोन पंचासह व सहकारी कर्मचाऱ्यांसह स्मशानभुमीजवळ वॉर्ड क्रमांक 6 परीसर घुग्गुस येथे अंदाजे सकाळी 5 वाजेपासुन दबा धरून बसले असता अंदाजे एक तासानंतर खबरीने खबर दिल्या नुसार वरील नमुद क्रमांकाचे वाहन येताना दिसले.या वाहनाची तपासणी केली असता वाहनामधील मागच्या डीक्कीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या 90 मि.ली.च्या एकूण 10 खर्ड्याचे खोके सापडले. प्रत्येकी खोक्यामध्ये 100 बाटल्या प्रमाणे 1 हजार बाटल्या तसेच गाडीच्या मागच्या सिटवर रॉकेट देशी दारू संत्रा या कंपनीच्या 90 मि.ली.च्या एकूण 20 खर्ड्याचे खोके सापडले. प्रत्येकी खोक्यामध्ये 100 बाटल्या प्रमाणे 2 हजार बाटल्या असे एकूण 30 खर्ड्याचे खोके मधील 30 हजार म. रा. निर्मीत देशी दारू बाटल्यांची किंमत 78 हजार रू. किमतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल मिळून आला. वाहन चालकाचे नांव राकेश राजेश दुर्गेवय - 28 वर्षेरा. मातारदेवी वॉर्डदर्ग्याजवळ वॉर्ड नं. 1 घुग्गुस ता. जि. चंद्रपूर असे आहे.
आरोपीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65,(अ),(ई) अन्वये गुन्हा अजामीनपात्र असल्याने सदर आरोपीस जागेवरच अटक करून कार्यालयातील गुन्हा क. 33/2020 नोंदवुन गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
सदरची कारवाई अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कचंद्रपूर सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.एस. पाटील,सहाय्यक दुय्यम निरीक्षक अजय खताळजगदीश कापटेप्रविकांत  निमगडे आदींनी पार पाडली.
00000

No comments:

Post a Comment