Search This Blog

Thursday, 18 June 2020

जिल्हा कारागृहातून 76 कैद्यांची अंतरिम जामिनावर मुक्तता

जिल्हा कारागृहातून 76 कैद्यांची
अंतरिम जामिनावर मुक्तता
चंद्रपूर,दि.18 जून: कोविड-19 संसर्ग परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा कारागृहातून 76 कैद्यांची अंतरिम जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहेअशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किरण जाधव यांनी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालय यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पारित केलेल्या आदेशानुसार  राज्य उच्चाधिकार समिती स्थापन झाली. या समितीने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व निश्चित केलेल्या निकषानुसार चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकाक्षेत्रात प्रलंबित फौजदारी प्रकरणे असलेल्या चंद्रपूर कारागृहातील बंद्यांचे जामीन अर्ज संबंधीत न्यायालयात सादर करण्यात आले.
त्यावर विहित प्रक्रियेद्वारे कार्यवाही होउन 15 जून 2020 पर्यंत 76 बंद्यांची अंतरिम जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे. सदर बंद्यांनी ठराविक कालावधीनंतर संबंधीत पोलिस ठाण्यात उपस्थिती लावणे निर्देशित करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment