Search This Blog

Friday 19 June 2020

वणी ते घुग्घूस रस्त्यावरील वर्धा नदीच्या पुल बांधकामाकरिता नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

वणी ते घुग्घूस रस्त्यावरील वर्धा नदीच्या
पुल बांधकामाकरिता
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा
चंद्रपूरदि. 19 जून : वणी ते घुग्घूस रस्त्यावरील वर्धा नदीच्या पुलाचे काम करणे असल्याने सदर रस्त्याची वाहतूक बंद करून पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे.जनतेला त्रास व असुविधा होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण होवू नये याकरिता घुग्घूस-वणी रस्ता बंद  करून पर्यायी मार्ग निश्चित केला आहे.
असा असणार पर्यायी मार्ग :
पर्यायी मार्ग एक  घुग्घूस- नकोडा- मुंगोली -सिंदोला-आबाई फाटा- चारगांव चौकी ते वणी हा असणार आहे. पर्यायी मार्ग दोन घुग्घूस- ताडाली- घोडपेठ -भद्रावती- कोंढा -माजरी -पाटाळा ते वणी हा असणार आहे. तर पर्यायी मार्ग तीन घुग्घूस- ताडाली -भद्रावती- वरोरा- वणी हा असणार आहे.
नागरिकांना धोकाअडथळा किंवा गैरसोय होऊ नये. कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नयेकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरिता प्रमुख राज्यमार्ग क्रमांक 14 घुग्घूस-वणी मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाचे काम करणे असल्याने सदरचा रस्ता दिनांक 22 जून 2020 पासून 30 दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येत आहे. वाहतूकदारांनी वरील दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment