Search This Blog

Wednesday, 24 June 2020

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू
चंद्रपूर,दि.24 जून: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चालणारे विविध कामकाज सुरू केलेले आहे. यामध्ये वाहन नोंदणीवाहन हस्तांतरणवाहन विषयक सर्व कामेपरवाना विषयक सर्व कामेवायुवेग पथकअनुज्ञप्ती जारी करणेअनुज्ञप्ती दुय्यम करणेअनुज्ञप्ती विषयक सर्व कामे सुरु करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मध्यंतरीच्या काळात विभागाने रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कामे बंद केली होती. त्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे कामे करून ऑनलाईन पद्धतीने कामे पुन्हा सुरू केली आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment