Search This Blog

Friday 19 June 2020

आत्मभान अभियानातील फोन इन कार्यक्रमाचे 20 जून सकाळी 10.30 ला प्रसारण

आत्मभान अभियानातील फोन इन कार्यक्रमाचे
20 जून सकाळी 10.30 ला प्रसारण
ऐका ! जिल्हाधिकारी यांच्या सोबतचा
कोरोना आणि प्रशासनाची तयारी विषयीचा संवाद
चंद्रपुर,दि. 19 जून: जिल्हा प्रशासनाने कोरोना जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत 17 जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर संवाद साधला होता. या कार्यक्रमाचे प्रसारण दिनांक 20 जून शनिवारला सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी कशी आहेजिल्ह्यातील कोरोना काळातील सद्यस्थिती काय आहेप्रशासनातील यंत्रणा कशा पद्धतीने काम करीत आहे असे अनेक प्रश्नांचं निरसन फोन-इन कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
फोन इन कार्यक्रम आकाशवाणी केंद्र चंद्रपूर येथून प्रसारित होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर नागरिकांशी साधलेला संवाद ऐकावाअसे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment