Search This Blog

Tuesday, 9 June 2020

सीईओ साधतील 10 जून बुधवार रोजी नागरिकांशी संवाद

सीईओ साधतील 10 जून बुधवार रोजी नागरिकांशी संवाद
नागरिकांना थेट विचारता येणार प्रश्न
चंद्रपूरदि.9 जून: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम 13 जून पासून सुरू होणार आहे. 13 जून शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या  कोरोना आणि जनसंपर्क या विषयावर उद्या 10 जून रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जनजागृती संदर्भात नवनवीन उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवीपरराज्यातून,परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी परवानगी कशी घ्यावीकुठे संपर्क साधावा एकंदरीत या काळात दैनंदिन काम करायचे असल्यास काय करावे, असे अनेक  प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण थेट फोन करून हे प्रश्न विचारू शकता.
या फोन-इन कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दिनांक 10 जून बुधवार रोजी  होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी 11 ते 11:30 या  वेळेत जास्तीत जास्त 07172-254634 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता.
कोरोना आणि प्रशासनाची तयारी याविषयी नागरिकांमधील असलेल्या प्रश्नांचं फोन करून निरसन करू शकता. नागरिकांच्या प्रश्नांचशंकांच निरसन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले करणार आहेत.तेव्हा अवश्य फोन करा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी फोन-इन या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment