Search This Blog

Monday 22 June 2020

चंद्रपूर जिल्ह्यात एक हजारावर नागरिक संस्थात्मक अलगीकरणात

चंद्रपूर जिल्ह्यात एक हजारावर नागरिक
संस्थात्मक अलगीकरणात
जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 14;
आतापर्यतची बाधित संख्या 57
Ø  स्नेह नगरातील मुंबईवरून आलेला युवक पॉझिटीव्ह
Ø  43 बाधित कोरोनातून झाले बरे
Ø  जिल्ह्यात 79 हजारांवर नागरिक दाखल
Ø  4 हजारावर नागरिक गृह अलगीकरणात
Ø  सध्या फक्त 4 कंटेनमेंट झोन कार्यरत
Ø  आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधीतांची शोध मोहीम
चंद्रपूर,दि. 22 जून: चंद्रपूर महानगरातील स्नेह नगर परिसरातील 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार  जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित नागरिकांची संख्या 57 झाली आहे. हा युवक 13 जून रोजी मुंबईवरून परत आला होता. त्याला गृह अलगीकरणात ठेवण्यात आले होते. आरोग्य सेतू अॅपवरील नोंदीमुळे त्याची माहिती मिळाली. 21 जून रोजी या युवकाचे स्वॅब घेण्यात आले होते. 22 जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंतची बाधितांची संख्या 57 आहे. यापैकी 43 कोरोना बाधित कोरोना मुक्त झालेले आहेत.त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आलेली आहे. सध्या अॅक्टिव्ह बाधीतांची संख्या 14 आहे. यापैकी 11 बाधित कोविड केअर सेंटरवन अकादमी चंद्रपुर येथे भरती करण्यात आलेले आहे. दोन बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे  तसेच एक बाधित गृह
अलगीकरणात आहे.या बाधिताची भरती करण्याची कार्यवाही सुरू आहे. या सर्व बाधीतांची प्रकृती स्थिर आहे.
सध्या फक्त 4 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 25 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 21 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात फक्त 4 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 25 कंटेनमेंट झोनमधील आयएलआय रुग्णांचे 59 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 57 नमुने निगेटिव्ह,एक पॉझिटिव्ह तर एक नमुना प्रतीक्षेत आहे.
सर्व आयएलआय व सारीच्या रुग्णांना निरीक्षणामध्ये ठेवण्यात आलेले आहे. कंटेनमेंट झोनमधील सर्व आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत आहे. कॅच दि कोरोना व्हायरस या मोहिमेअंतर्गत एकूण 17 पॉझिटिव्ह आढळले आहे.
कोविड-19 संक्रमित 57 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5हरियाणा (गुडगाव)-1ओडीसा-1गुजरात-4हैद्राबाद-1मुंबई-10ठाणे -3पुणे-6नाशिक -3जळगांव-1यवतमाळ -4प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4संपर्कातील व्यक्ती - 14 आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7बल्लारपूर दोनपोंभूर्णा दोनसिंदेवाही दोनमुल तीनब्रह्मपुरी 12नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर तीनवरोरा दोनराजुरा दोनमुल एकभद्रावती एकब्रह्मपुरी एककोरपणा एकनागभिड एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ दोनबालाजी वार्ड एकभिवापूर वार्ड एकशास्त्रीनगर एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 57 वर गेली आहे.
जिल्ह्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह बाधितांची तपासणी पूर्वीची अलगीकरण व लक्षणांवरून संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण कोविड-19 पॉझिटिव्ह 57 बाधित आहेत. यापैकी गृह अलगीकरणातील 15 बाधितसंस्थात्मक अलगीकरणातील 25 बाधितएकूण सारी लक्षणे असलेले 3 बाधित तर आयएलआय लक्षणे असलेले 14 बाधित आहेत.
आरोग्य सेतू ॲपचा वापर करून बाधीतांची शोध मोहीम :
दिनांक 11 जून पासून आरोग्य सेतू ॲप वरील मिळालेल्या माहितीच्या आधारे ब्लूटूथ निकटता (ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी) गंभीर आजार असलेलेकोविडचे संभाव्य लक्षणे असणाऱ्या (अनवेल कोमॉरबीडीटी) व्यक्तींचा डाटा प्राप्त करून मुख्य वैद्यकीय अधिकारी (महानगरपालिका चंद्रपूर)संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना यादी पाठविण्यात येते.सदरील व्यक्तींची आरोग्य तपासणी करून जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित करून व स्वॅब घेवून शोध मोहीम सुरू केलेली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 3 हजार 102 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 57 नमुने पॉझिटिव्ह,2 हजार 818 नमुने निगेटिव्ह205 नमुने प्रतीक्षेत तर 22 अनिर्नयीत  आहेत.
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 37 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 392 नागरिक,तालुकास्तरावर 365 नागरिक तरजिल्हास्तरावर 280 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 79 हजार 608 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 74 हजार 879 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 4 हजार 729 नागरिकांचे गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित )13 मे ( एक बाधित)20 मे ( एकूण 10 बाधित )23 मे ( एकूण 7 बाधित)24 मे ( एकूण 2 बाधित)25 मे ( एक बाधित )31 मे ( एक बाधित )2 जून (एक बाधित)4 जून (दोन बाधित)5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित)7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित)10 जून ( एक बाधित)13 जून ( एक बाधित)14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित)16 जून ( एकुण 5 बाधित)17 जून ( एक बाधित)18 जून ( एक बाधित)21 जून (एक बाधित) आणि 22 जून (एक बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 57 झाले आहेत. आतापर्यत 43 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  57 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 14 आहे.
00000

No comments:

Post a Comment