Search This Blog

Thursday 18 June 2020

राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2017-18 व 2018-19 करिता अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2017-18 व 2018-19
करिता अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.18 जून: युवक कल्याण व क्रीडा मंत्रालययुवा कल्याण विभागनवी दिल्लीच्या वतीने सन 2017-18 व 2018-19 या वर्षाकरिता राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले आहेत. त्यासाठी दि. 19 जून 2020 पर्यंत मुदत राहणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या संदर्भात पत्रक जारी करण्यात आले आहे.  जिल्हयातील युवक युवतींनी  अर्ज सादर करावयाचे आहेत.निवड प्रक्रीयेसाठी आवश्यक आलेल्या मार्गदर्शक सूचने सोबत अर्ज दि. 26 जुन पर्यंत क्रीडा व युवा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहे.
 चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकयुवती व संस्थांनी अर्जाचा विहित नमूना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सन 2017-18 व 2018-19 वर्षातील राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी  केले आहे.
00000

No comments:

Post a Comment